गाझामधील हिंसाचार बेधडकपणे जगासमोर आणणाऱ्या ४ पत्रकारांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:52 AM2024-08-28T11:52:20+5:302024-08-28T11:54:06+5:30
Gaza Journalism Nobel Prize, Israel Hamas War: यावर्षी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा १० ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे.
Gaza Journalism Nobel Prize, Israel Hamas War: गाझामध्ये युद्धाच्या भीषण परिस्थितीतही आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून लष्कराच्या कारवाया आणि गाझामधील नागरिकांची दयनीय अवस्था जगाला दाखविणाऱ्या गाझातील चार पत्रकारांची यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यावर्षी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा १० ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. नोबेल पुरस्कार हा सहा वेगवेगळ्या क्षेत्रात दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो, ज्यांनी गेल्या वर्षभरात सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे.
हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला संघर्ष कव्हर केल्याबद्दल छायाचित्रकार मोताझ अझैझा, टीव्ही रिपोर्टर हिंद खोदरी, पत्रकार आणि कार्यकर्ता बिसान ओवदा आणि गाझा येथील ज्येष्ठ रिपोर्टर वेल अल-दहदौह यांची नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आली आहे.
(डावीकडून) फोटो पत्रकार मोताज़ अज़ाइज़ा, टीवी रिपोर्टर हिंद ख़ुदरी, पत्रकार और कार्यकर्ता बिसन ओवदा और वरिष्ठ रिपोर्टर वाएल अल-दहदौह
अझिझाने सोशल मीडियावर पोस्ट केले, "गाझामधील अत्याचार जगासमोर आणल्याल्याबद्दल मला २०२४ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मला शुभेच्छा द्या आणि मला आशा आहे की माझ्या लोकांना आता शांती मिळेल. पॅलेस्टाईन भयमुक्त व्हावे हीच सदिच्छा." टीव्ही रिपोर्टर हिंद खोदरी यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले, "माझ्या लोकांची हत्या होत असताना अशा नोबेल पुरस्काराचे काय? गेले ३०० दिवस लोक मरत आहेत आणि काहीही बदलले नाही. याचा काय उपयोग झाला? या बक्षीसाबद्दल मी आनंदी किंवा दु:खी काहीही नसेन.”