लेबनानमध्ये इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हिज्बुल्लाच्या टॉप कमांडरला घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 10:40 AM2024-11-03T10:40:58+5:302024-11-03T10:41:39+5:30
Israel Lebanon, Top Hezbollah commander captured: किनारपट्टीवर उतरलेल्या सशस्त्र सैन्यगटाने कमांडरला पळवून इस्रायलच्या हद्दीत नेल्याची माहिती
Israel Lebanon, Top Hezbollah commander captured: इस्रायली नौदलाने उत्तर लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या एका बड्या कमांडरला ताब्यात घेतले. इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव न सांगता अधिकाऱ्याने सांगितले की, ही कारवाई उत्तर लेबनानच्या बॅट्रोन शहरात करण्यात आली. याआधी शनिवारी, लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितले की ते इस्रायलने लेबनीज सागरी कॅप्टनला पकडले. त्याला शुक्रवारी बॅटरुनच्या किनारपट्टीवर उतरलेल्या सशस्त्र गटाने पळवून नेले. या अधिकाऱ्याने सांगितले की, ताब्यात घेतलेल्या कमांडरला इस्रायलच्या हद्दीत घेऊन जाण्यात आले असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
संयुक्त राष्ट्र अंतरिम दलाने (UNIF) इस्रायली नौदलाच्या या कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्सने सांगितले की, UNIFIL लेबनानमध्ये कोणाचेही अपहरण करण्यात किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करण्यात सहभागी नाही. ते अशी कुठलीही कारवाई करत नाहीत ज्याने सैन्यदलाची शांतता आणि स्थिरता धोक्यात येते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात लेबनानमध्ये उपस्थित असलेला हिजबुल्लाह हा सशस्त्र गट हमासला पाठिंबा देत आहे. त्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातही तणाव वाढला आहे. दोघेही अनेकदा एकमेकांना लक्ष्य करत असतात. त्यामुळे अशा करावायांमध्ये सहभागी न होण्याची भूमिका युनिफिलने घेतली आहे.
इस्रायलने युद्धाचा एक नवीन टप्पा जाहीर केला आहे. त्यांचा उद्देश हिज्बुल्लाला सीमेवरून मागे नेणे हे आहे, जेणेकरून उत्तर इस्रायलमधून विस्थापित हजारो लोक परत येऊ शकतील. इस्रायल सातत्याने लेबनानवर हल्ले करत आहे. या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख नसरल्लाहसह अनेक वरिष्ठ नेते मारले गेले आहेत.