इस्रायलने पहिल्यांदाच गाझावर दाखवली दया; मदतीचा मार्ग केला खुला; ओलिसांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:52 PM2023-12-18T17:52:06+5:302023-12-18T17:52:38+5:30

इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी भूभागावरील हल्ले थांबवले नाहीत, तर ते अधिक तीव्र केले आहेत.

israel hamas war updates israel opens aid crossing to gaza first time since war began | इस्रायलने पहिल्यांदाच गाझावर दाखवली दया; मदतीचा मार्ग केला खुला; ओलिसांना...

इस्रायलने पहिल्यांदाच गाझावर दाखवली दया; मदतीचा मार्ग केला खुला; ओलिसांना...

इस्रायली सैन्याने हमासविरुद्धच्या युद्धात आपली मोहीम सुरूच ठेवली आहे. हजारो पॅलेस्टिनींच्या मृत्यूनंतर जगभरातील टीकेला सामोरे जाणाऱ्या इस्रायलने आता गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने हल्ले थांबवण्याचा सल्लाही दिला होता. इस्रायलचे हे रूप हमासविरुद्धच्या युद्धात प्रथमच पाहायला मिळालं आहे. याशिवाय ओलिसांच्या सुटकेसाठीही चर्चा सुरू आहे.

गाझामध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित युद्धादरम्यान इस्रायली सैन्याने रविवारी हमासचा सर्वात मोठ्या बोगद्याचा खुलासा केला. हा बोगदा चार किलोमीटरहून अधिक लांब आहे. इस्रायली लष्कराचा दावा आहे की हमास या बोगद्याचा वापर दहशतवादी लढवय्यांसाठी पुरवठा आणि शस्त्रे वाहतूक करण्यासाठी करत होता. लोकांच्या हत्येनंतर जगभरातून टीकेला सामोरे जावे लागत असताना इस्रायली लष्कराने गाझा पट्टीतील हा 4 किलोमीटर लांबीचा बोगदा शोधून काढला आहे. 

काही दिवसांपूर्वी आयडीएफने गाझा पट्टीमध्ये तीन लोकांना गोळ्या घातल्या होत्या. आयडीएफने नंतर कबूल केले की ते चुकून मारले गेले. मृत इस्रायली होते आणि हमासने त्यांना ओलीस ठेवले होते. इस्रायलनेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. युद्धामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

हमाससोबत युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलने प्रथमच दया दाखवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी, गाझामध्ये मानवतावादी मदतीचा मार्ग खुला झाला. युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच, IDF ने इस्रायल-गाझा-इजिप्त त्रिपक्षीय सीमेवरील केरेम शालोम क्रॉसिंग उघडले जेणेकरून गाझा रहिवाशांपर्यंत पोहोचणाऱ्या अन्न, औषध आणि इतर आवश्यक वस्तूंची संख्या दुप्पट होईल.

इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी भूभागावरील हल्ले थांबवले नाहीत, तर ते अधिक तीव्र केले आहेत. इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही किंमतीत हमासचा नायनाट करणं हे त्यांचं ध्येय आहे आणि ते थांबणार नाही. आपल्या ओलिसांची सुटका करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटलं आहे.

ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायली लष्कर आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. गेल्या महिन्यात पाच दिवसांच्या युद्धबंदीदरम्यान हमासने 100 ओलिसांना इस्रायलच्या स्वाधीन केले होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही गाझा सीमेवर शेकडो पॅलेस्टिनींना सोडले. इस्रायली अधिकार्‍यांनी सांगितले की, दहशतवादी गट हमासचा खात्मा करण्याच्या उद्देशाने त्यांचा लढा सुरूच आहे.
 

Web Title: israel hamas war updates israel opens aid crossing to gaza first time since war began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.