'तुम्ही हमासला सांभाळा, बाकी सारं आम्ही बघतो..'; अमेरिकेचा इस्रायलला खंबीर पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 06:21 PM2023-10-10T18:21:19+5:302023-10-10T18:21:46+5:30
युद्धात नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे अमेरिकेचे इस्रायलला आश्वासन
Joe Biden USA, Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. या युद्धाची झळ हळूहळू जगभरात बसण्याची शक्यता आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या युद्धात हमासविरोधात दंड थोपटले आहेत. अमेरिकेचा जवळचा मित्र असलेल्या इस्रायलसोबत आपण ठामपणे पाठिशी उभे आहोत असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इस्रायलला मोठ्या प्रमाणावर शस्त्रे पाठवली आहेत. बायडेन म्हणाले आहेत की, संकटाच्या काळात अमेरिकन जनता इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. ते म्हणाले, 'अमेरिकेला स्पष्टपणे इस्रायलच्या लोकांना, संपूर्ण जगाला आणि जगभरात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना सांगायचे आहे की आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत आणि आमचा विचार कधीही बदलणार नाही.'
Let there be no mistake: the United States stands with the State of Israel. pic.twitter.com/lRbPLflhzc
— Joe Biden (@JoeBiden) October 7, 2023
एकीकडे बायडेन यांनी उघडपणे इस्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे, तर दुसरीकडे इस्रायली सैन्य हमासवर कठोरपणे प्रतिहल्ले करत आहे. बायडेन यांनी ट्विट केले, "इस्रायल स्वतःचे रक्षण करू शकेल याची खात्री करण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटन नेहमीच एकजुटीने उभे राहतील आणि एकमेकांशी समन्वय साधतील. आमचा मित्र इस्रायल याच्या पाठीशी आम्ही आहोत. मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आश्वासन देतो की युनायटेड स्टेट्स हे सुनिश्चित करत राहील की इस्रायलला स्वतःचे आणि आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सारं काही मिळेल. ही अतिशय संवेदनशील वेळ असून अमेरिकन जनता इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे." दरम्यान, इराणकडून इस्रायलवर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने हा इशारा दिल्याचे मानले जात आहे.
This morning, I spoke with @IsraeliPM to express my full support for the people of Israel in the face of an unprecedented and appalling assault by Hamas terrorists.
— President Biden (@POTUS) October 8, 2023
We will remain in close contact over the coming days.
The U.S. will continue to stand with the people of Israel.
इस्रायली सैन्याने हमासवर हल्ला केला
अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायली लष्कराने आता हमासवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. इस्रायलची विमाने गेल्या ४ दिवसांपासून गाझामध्ये बॉम्बचा वर्षाव करत आहेत. इस्रायली विमाने दिवसा आणि रात्री सतत उड्डाण करत आहेत आणि हमासच्या अधिपत्याखाली असलेले दहशतवादी तळ बेचिराख करत आहेत, त्यांच्या जागा उद्ध्वस्त करत आहेत. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांच्या विमानांनी हमासचे 200 तळ नष्ट केले आहेत. हमासकडून ही तळ दहशतवादी केंद्र म्हणून वापरात होती. या ठिकाणांहून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात होते.