'युद्धविराम होऊ शकतो, पण...', हिजबुल्लाच्या नवीन प्रमुखाने शांततेसाठी ठेवली अट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:06 PM2024-10-31T22:06:45+5:302024-10-31T22:09:04+5:30

Israel-Hezbollah War: इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात गेल्या काही काळापासून तीव्र संघर्ष पेटला आहे.

Israel-Hezbollah War 'Cease fire may happen, but', Hezbollah's new chief sets condition for peace; Israel's attacks continue | 'युद्धविराम होऊ शकतो, पण...', हिजबुल्लाच्या नवीन प्रमुखाने शांततेसाठी ठेवली अट

'युद्धविराम होऊ शकतो, पण...', हिजबुल्लाच्या नवीन प्रमुखाने शांततेसाठी ठेवली अट

Israel-Hezbollah War : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात गेल्या काही काळापासून तीव्र संघर्ष पेटला आहे. अशातच, हिजबुल्लाचा नवीन चीफ नइम कासिम याने बुधवारी काही अटींवर युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. इस्त्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने संभाव्य युद्धविरामावर चर्चा केल्यावर नइम कासिमचे विधान आले आहे. तर दुसरीकडे, इस्त्राईलने पूर्वेकडील लेबनीज शहर बाल्बेकवर हल्ला करत आणखी एका हिजबुल्ला कमांडरचा खात्मा केला आहे. 

लेबनीजचे पंतप्रधान नजीब मिकाती म्हणाले की, ते येत्या काही तासांत किंवा दिवसांत युद्धविराम करण्याबाबत आशावादी आहेत. अमेरिकेचे दूत अमोस हॉचस्टीन यांनी सुचवले आहे की, आम्ही येत्या काही दिवसांत, यूएस निवडणुका झाल्यानंतर युद्धविराम गाठू शकतो.

हिजबुल्लाला नवीन प्रमुख मिळाला
दरम्यान, गेल्या महिन्यात इस्रायलने केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात हसन नसराल्लाह मारला गेल्यानंतर कासिम मंगळवारी इराण-समर्थित सशस्त्र चळवळीचा नेता बनला. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात तो म्हणाले की, हिजबुल्लाह अनेक महिने लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांचा प्रतिकार करू शकेल. मात्र, इस्त्रायने प्रस्ताव मांडल्यास वाटाघाटीद्वारे युद्धविरामाचा मार्गही खुला असेल.

इस्रायलही युद्धबंदीचा विचार करत आहे
इस्रायलचे ऊर्जा मंत्री एली कोहेन यांनी सांगितले की, युद्धविराम करण्यासाठी कोणत्या अटी येणार, यावर चर्चा करण्यासाठी देशाच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. रिपोर्ट्सनुसार, 60 दिवसांच्या युद्धविरामाच्या बदल्यात इस्रायलच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी उशिरा मंत्र्यांची भेट घेतली. 

Web Title: Israel-Hezbollah War 'Cease fire may happen, but', Hezbollah's new chief sets condition for peace; Israel's attacks continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.