१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 02:21 PM2024-09-30T14:21:21+5:302024-09-30T14:21:50+5:30

चार आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या या छोट्याशा देशाने प्रथम हमासला उद्ध्वस्त केले. त्यानंतर हिजबुल्लाहला हादरवलं. 

israel hezbollah war: Israel has continued to strike Lebanon From pager blasts to Hassan Nasrallah killing | १२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव

१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव

हमाससह इस्त्रायलच्या युद्धात सातत्याने रॉकेट डागून लेबनानवर इस्त्रायलनं हल्ला केला तेव्हा सगळीकडे उद्ध्वस्त झाले. मागील ७ ऑक्टोबरला हमासने इस्त्रायलवर घातक हल्ला केला. हजारो लोकांना मारले, बंधक बनवले. इस्त्रायल त्यात गुंतला असताना लेबनाननं मागून रॉकेट हल्ले सुरू केले. इस्रायल डगमगला नाही तर टिकला. आधी  गाझामध्ये घुसून हमासचा खात्मा केला. जमिनीखाली लपून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांचा शोधून शोधून मारला. अनेकांना सुरंगमध्येच दफन केले. त्यानंतर आता हिजबुल्लाहची वेळ आली.

मागील काही हल्ल्यानंतर इस्त्रायलनं सीक्रेट प्लॅनिंग बनवून हिजबुल्लाहला सडेतोड उत्तर दिले. इस्रायलनं निर्धार आता केला आहे. चार आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या या छोट्याशा देशाने प्रथम हमासला उद्ध्वस्त केले. त्यानंतर हिजबुल्लाहला हादरवलं. आता येमनच्या हुथींची पाळी आहे त्यानंतर इराणशी युद्ध होण्याची शक्यता आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला १७ ते २८ सप्टेंबर २०२४ या काळातील घटनाक्रम समजून घ्यावा लागेल. ज्यामध्ये इस्रायलने हिजबुल्लाहच्या सर्व आकांचा शिरच्छेद केला.

१७ सप्टेंबर २०२४ - हजारोंच्या पेजरमध्ये एकाचवेळी स्फोट झाले, १३ लोक मारले गेले. ज्यात हिजबुल्लाहच्या सदस्यांचा आणि काही मुलांचा समावेश होता. ४ हजार लोक जखमी झाले. इस्त्रायलनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही परंतु हल्ला इस्त्रायलनेच केला असं जगाला वाटते. आम्ही लेबनान सीमेवर हजारो विस्थापित इस्रायलींना त्यांच्या घरी परत आणू. याचा अर्थ आम्ही हिजबुल्लाला संपवू तरच हे शक्य होईल असं इस्त्रायलने म्हटलं.

१८ सप्टेंबर २०२४ - वॉकी टॉकीसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट, लेबनान पेजर हल्ल्यातून सावरलं नव्हते त्यात त्यांच्या घरात विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट झाले, १४ लोक मारले गेले. जवळपास ४५० जखमी झाले. 

१९ सप्टेंबर २०२४ - इस्त्रायलनं दक्षिणी लेबनानच्या शेकडो रॉकेट लॉन्चर प्लॅटफॉर्मला एअरस्ट्राइकने उद्ध्वस्त केले. इस्त्रायली सैन्याला बातमी कुठून लागली याचा हिजबुल्लाहला थांगपत्ताच नाही. 

२० सप्टेंबर २०२४ - इस्त्रायलने बेरुत इथल्या उच्चभ्रू वस्तीतील एका इमारतीला टार्गेट केले. त्यात हिजबुल्लाह कमांडर इब्राहिम आकिल मारला गेला. त्यासह ३७ लोकही मेले. शेकडो जखमी झाले. हिजबुल्लाहचे १५ सदस्य मारले गेले. १९८३ मध्ये बेरुतच्या अमेरिकन दूतावासजवळ स्फोट घडवणारा आकिल अमेरिकेत वॉन्टेड होता. आकिलनं हमाससोबत मिळून ७ ऑक्टोबर २०२३ ला इस्त्रायलवर हल्ल्याची योजना बनवली होती.

२१ सप्टेंबर २०२४ - इस्त्रायली सैन्याने लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ४०० ठिकाणांवर घातक एअरस्ट्राइक केला. त्यात हिजबुल्लाह रॉकेट लॉन्चर्स उद्ध्वस्त झाले. 

२२ सप्टेंबर २०२४ - हिजबुल्लाह आणि इस्त्रायल यांच्यात रात्रभर फायरिंग झाली, रॉकेट आणि ड्रोन हल्ले झाले. त्यात इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या २९० ठिकाणांना लक्ष्य केले. 

२३ सप्टेंबर २०२४ - इस्रायलने लेबनानच्या लोकांना तात्काळ घरे सोडण्याचा इशारा दिला. यानंतर इस्रायलने १३०० हवाई हल्ले केले. त्यात ५५८ लोक मारले गेले. त्याच दिवशी हिजबुल्लाहने इस्रायलच्या दिशेने सुमारे २०० रॉकेट डागले त्यापैकी बहुतेकांना इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रोखले होते.

२४ सप्टेंबर २०२४ - हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात हल्ले सुरूच होते. दक्षिण लेबनानमधून लोक पळू लागले. इस्रायलने हवाई हल्ले थांबवले नाहीत. यातच बेरूत येथे इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाह मिसाइल विभागाचा कमांडर इब्राहिम काबिसी मारला गेला.

२५ सप्टेंबर २०२४ - हिजबुल्लाहने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागले जे तेल अवीवपर्यंत पोहोचले. एखाद्या दहशतवादी संघटनेने एवढ्या लांब क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर इस्रायलने हवाई हल्ले सुरूच ठेवले. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सैनिकांसह ७२ जणांचा मृत्यू झाला होता

२६ सप्टेंबर २०२४ - न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची आमसभा सुरू होती. G-7 चा प्लॅन २१ दिवसांची युद्धविराम घोषित करण्याची होता जेणेकरून इस्रायल आणि लेबनानमधील परिस्थिती थोडी शांत होऊ शकेल. मात्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ते फेटाळून लावले. त्यानंतर इस्रायलने हवाई हल्ला केला.त्यात हिजबुल्लाहच्या सैनिकांसह ९२ लोक मारले गेले १५० जखमी झाले

२७ सप्टेंबर २०२४ - आपला देश अनेक आघाड्यांवर युद्ध जिंकत असल्याचे नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले. यानंतर तो इराणवरही हल्ला करणार आहे. त्याच्या साथीदारांनाही संपवेल असं विधान केले. नेतान्याहू यांचे भाषण सुरू असताना इस्त्रायली हवाई दल बेरूतमध्ये बॉम्ब आणि मिसाईल टाकत होते.

२८ सप्टेंबर २०२४ - इस्त्रायली सैन्याने बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाहला ठार केले आहे. हिजबुल्लाहने काही तासांनंतर याची पुष्टी केली.

Web Title: israel hezbollah war: Israel has continued to strike Lebanon From pager blasts to Hassan Nasrallah killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.