हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 08:20 PM2024-10-02T20:20:36+5:302024-10-02T20:21:16+5:30

Israel Iran War Updates: सीमेजवळ दोन ठिकाणी इस्रायल डिफेन्स फोर्सशी (IDF) सामना झाल्याचा हिजबुल्लाचा दावा

Israel Iran War Live Updates Israel confirms first casualty in close-range clashes with Hezbollah in Lebanon | हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू

हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू

Israel Iran War Updates: इस्त्रायली सैन्य लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या विरोधात जमिनीवर कारवाई करत आहे. या युद्धात एक इस्रायली कमांडर मारला गेला. इस्रायलने लेबनानवर जमिनीवर हल्ला करत असल्याची घोषणा कालच केली होती. सीमेजवळ दोन ठिकाणी इस्रायल डिफेन्स फोर्सशी (IDF) सामना झाल्याचा हिजबुल्लाचा दावा आहे. इस्त्रायली आर्मी आणि आयडीएफच्या ग्राउंड ऑपरेशन दरम्यान हा कमांडर मारला गेल्याचे लेबनीज आर्मीनेही म्हटले आहे.

इस्त्रायल टाईम्सच्या वृत्तानुसार, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायली ड्रोन हल्ला झाला आहे, असे त्यांनी सांगितले. यामध्ये एक जवान जखमी झाला. लेबनीज लष्कराची एक तुकडी कावकाबा येथे असताना हा हल्ला झाला. लेबनान सीमेवर इस्रायली सैनिकांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणल्याचे हिजबुल्लाचे म्हणणे आहे. जेव्हा शत्रूच्या सैन्याने यारून गावाभोवती घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्या सैनिकांनी त्यांना लक्ष्य केले आणि स्फोट घडवून आणला.

अहवालानुसार, IDF होम फ्रंट कमांड उत्तर इस्रायलमध्ये काही निर्बंध शिथिल करत आहे. याचे कारण म्हणजे हिजबुल्लाहच्या विरोधात त्याचे ग्राउंड ऑपरेशन चालू आहे. उत्तर सीमावर्ती शहरे गोलान हाइट्स आणि गॅलीली येथील रहिवासी १० ऐवजी ५० लोक घराबाहेर आणि १५० ऐवजी २५० लोक घरामध्ये एकत्र जमवू शकतील. हैफा बे, जेझरील व्हॅली आणि कार्मेलमध्ये ३० ऐवजी ६० लोकांना घराबाहेर जमण्याची परवानगी दिली जाईल.

७ महिला आणि १२ मुलांचा बळी

२ ऑक्टोबरला दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सुमारे ५१ लोक मारले गेले. यामध्ये महिला आणि लहान मुलेही आहेत. खान युनिसमध्ये बुधवारी सकाळी सुरू झालेल्या या कारवाईत ५१ जणांचा मृत्यू झाल्याचे गाझामधील आरोग्य मंत्रालयाने सांगितले. ८२ जखमी झाले. युरोपियन रुग्णालयाच्या नोंदीवरून असे दिसून आले की मृतांमध्ये ७ महिला आणि १२ मुलांचा समावेश आहे.

Web Title: Israel Iran War Live Updates Israel confirms first casualty in close-range clashes with Hezbollah in Lebanon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.