इस्रायलनं 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा कमांडर मारला, आतापर्यंत गाझात 10 हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 06:37 PM2023-10-31T18:37:11+5:302023-10-31T18:38:04+5:30

आपण गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात, 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या हमासच्या कमांडरचा खात्मा झाल्याचा दावा इजरायली सैन्य दलाने केला आहे.

Israel kills commander of October 7 attack, 10,000 dead in Gaza so far | इस्रायलनं 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा कमांडर मारला, आतापर्यंत गाझात 10 हजार जणांचा मृत्यू

इस्रायलनं 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा कमांडर मारला, आतापर्यंत गाझात 10 हजार जणांचा मृत्यू

हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलचे गाझापट्टीत जबरदस्त हल्ले सुरू आहेत. यातच आता, आपण गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात, 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या हमासच्या कमांडरचा खात्मा झाल्याचा दावा इजरायली सैन्य दलाने केला आहे. यासंदर्भात, इस्रायली डिफेन्स फोर्सने निवेदन जारी करत, आपण इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या हमासच्या बेट लाहिया बटालियनच्या कमांडरचा खात्मा केल्याचे म्हटले आहे. 

द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या दहशतवाद्याचे नाव निसाम अबू अजिना असे होते. त्याचा खात्मा करण्यात आला आहे. अबू अजिनाला हवाई हमल्याचा जानकार मानले जात होते. त्याने इस्रायल विरोधात यापूर्वीही अनेक हल्ल्यांचे नेतृत्व केले होते.

इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 10 हजार लोक मारले गेले -
यासंदर्भात बोलताना, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, अबू अजिनाच्या खात्म्यामुळे हमास आता इस्रायली सैन्याच्या जमिनीवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम नसेल. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 10 हजार लोक मारले गेले आहेत. याशिवाय 1400 इस्रायली लोकांचाही आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एवढेच नाही, तर जवळपास 250 इस्रायलींना हमासने बंदी बनवून ठेवले आहे, असे गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. गेल्या सोमवारपासून इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत जमिनीवरील हल्ल्यांनाही सुरुवात केली आहे. यात इस्रायलने आपले टँक गाझात घुसवले आहेत. 

इस्रायल कधीही शत्रुत्व संपवण्यास सहमत होणार नाही -
नेतन्याहू पुढे म्हणाले, 'ज्या पद्धतीने पर्ल हर्बरवरील बॉम्ब स्फोटांनंतर आणि 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने युद्धविराम मान्य केला नाही. त्याच पद्धतीने इस्रायलही हमास सोबतचे शत्रुत्व संपवण्यासाठी तयार होणार नाही. इस्रायल कधीही शत्रुत्व संपवण्यास सहमत होणार नाही...'

ही वेळ युद्धाची -
युद्धविरामासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, 'युद्धविरामाचे आवाहन म्हणजे, इस्रायलसाठी हमास समोर आत्मसमर्पण करण्याचे, दहशतवादासमोर आत्मसमर्पण करण्याचे, रानटीपणासमोर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन आहे आणि हे कधीही होणार नाही. बायबलमध्ये लिहिले आहे, एक वेळ शांततेची असते आणि एक वेळ युद्धाची असते. ही वेळ युद्धाची आहे.'
 

Web Title: Israel kills commander of October 7 attack, 10,000 dead in Gaza so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.