इस्रायलने गाझा पट्टी भागातील हमासच्या ठिकाणांवर केले हल्ले, सांगितलं 'या'मुळे दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:35 PM2020-08-13T20:35:47+5:302020-08-13T20:40:31+5:30

इस्रायली सैन्याने म्हटले आहे, की त्यांनी हमासच्या नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या एका ठिकाणाला, काही भूमिगत ठिकाणांना आणि काही चौक्यांना निशाना बनवले. 2007 मध्ये हमासच्या गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून  इस्रायल आणि हमासमध्ये तीन लढाया झाल्या आहेत. तसेच अनेक लाहन मोठ्या झटापटीही झाल्या आहेत.

israel launches overnight air strikes at hamas targets at gaza strip | इस्रायलने गाझा पट्टी भागातील हमासच्या ठिकाणांवर केले हल्ले, सांगितलं 'या'मुळे दिलं प्रत्युत्तर

इस्रायलने गाझा पट्टी भागातील हमासच्या ठिकाणांवर केले हल्ले, सांगितलं 'या'मुळे दिलं प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्देइस्रायली सेन्याने सांगितले, की पॅलेस्टाईन भागातून सातत्याने स्फोटके भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने हल्ले होत होते. 2007 मध्ये हमासच्या गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून  इस्रायल आणि हमासमध्ये तीन लढाया झाल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईन भागातून स्फोटके भरलेल्या फुग्यांनी हल्ले करण्यात येत होते.

गाझा सिटी : इस्रायलने बुधवारी गाझापट्टी भागातील हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले. यासंदर्भात इस्रायली सेन्याने सांगितले, की पॅलेस्टाईन भागातून सातत्याने स्फोटके भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने हल्ले होत होते. त्याला प्रत्युत्तर देत सकाळच्या सुमारास गाझापट्टीवर हल्ले करण्यात आले.

इस्रायली सैन्याने म्हटले आहे, की त्यांनी हमासच्या नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या एका ठिकाणाला, काही भूमिगत ठिकाणांना आणि काही चौक्यांना निशाना बनवले. 2007 मध्ये हमासच्या गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून  इस्रायल आणि हमासमध्ये तीन लढाया झाल्या आहेत. तसेच अनेक लाहन मोठ्या झटापटीही झाल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर अनौपचारिक तह झाल्याचेही दिसून आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईन भागातून स्फोटके भरलेल्या फुग्यांनी हल्ले करण्यात येत होते. यात शेजारील यहूदी शेतांत आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

इस्रायल भारताला देणार 'बराक-८ एलआरएस' डिफेन्स सिस्टीम -
भारत आणि चीनमध्ये सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव सुरू आहे. यातच भारत इस्राएलकडून 'बराक-८ एलआरएस' डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असल्याचे बोलले जाते. बराक-८ एलआरएसद्वारे लांब पल्ल्यावरील अंतरावर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागता येतात. 'एलआरएसएएम'चा अर्थ लाँग रेंज सरफेस टू एअर मिसाइल असा आहे. तसेच भारताने २०१८मध्ये इस्राएलसोबत जवळपास ५६८७ कोटी रुपयांच्या 'बराक-८' मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा करार केला आहे. त्यानूसार आता भारत इस्राएलकडून बराक-८ एलआरएस' खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

तत्पूर्वी, इस्रायलने फ्रेंडशिप डे निमित्त शोले चित्रपटातील 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या गीताचे संगीत असलेला एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करून भारताला शुभेच्छाही दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

Web Title: israel launches overnight air strikes at hamas targets at gaza strip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.