"24 तासांत...", इस्रायलने गाझामधील 11 लाख लोकांना दिला इशारा, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:32 PM2023-10-13T13:32:44+5:302023-10-13T13:33:13+5:30

Israel Palestine Conflict : गाझामधील लोकांसाठी एक निवेदन जारी करण्यापूर्वी इस्रायली सैन्याने संयुक्त राष्ट्रांना उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या 11 लाख लोकांना दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितलं होतं.

israel orders 11 lakh palestinians to move to southern gaza which indicates that idf is going to start ground operation | "24 तासांत...", इस्रायलने गाझामधील 11 लाख लोकांना दिला इशारा, 'हे' आहे कारण

"24 तासांत...", इस्रायलने गाझामधील 11 लाख लोकांना दिला इशारा, 'हे' आहे कारण

हमासबरोबरच्या युद्धादरम्यान, इस्रायली लष्कराने (IDF) गाझातील लोकांना गाझाचा उत्तर भाग रिकामा करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आयडीएफने शुक्रवारी गाझामधील सामान्य लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी गाझाच्या दक्षिणेकडील भागात जाण्यास सांगितले. इस्रायलने उत्तर गाझामधील 11 लाख लोकांना हा परिसर रिकामा करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे तेथे अराजकतेचे वातावरण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 11 लाख लोक दक्षिण गाझाकडे गेल्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतं, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

गाझामधील लोकांसाठी एक निवेदन जारी करण्यापूर्वी इस्रायली सैन्याने संयुक्त राष्ट्रांना उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या 11 लाख लोकांना दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितलं होतं. यानंतर, IDF ने गाझामधील लोकांना एक निवेदन जारी केले की, "पुढील विधान जारी झाल्यावरच तुम्ही शहरात परत याल आणि तुम्हाला शहरात प्रवेश दिला जाईल. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, गाझा शहराच्या दक्षिणेकडील भागात जा आणि आपल्या कुटुंबाला हमासच्या दहशतवाद्यांपासून दूर ठेवा जे तुमचा ढाल म्हणून वापर करत आहेत."

इस्रायली लष्कराने सांगितले की, येत्या काही दिवसांत IDF गाझा शहरात मोठी कारवाई करेल आणि नागरिकांना हानीपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. इस्रायली सैन्याने उत्तरेकडील शहर रिकामे करण्याचा इशारा दिल्यानंतर गाझामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरली आहे. एवढ्या कमी वेळात 11 लाख लोक शहर सोडून दुसरीकडे कसे जाऊ शकतात, याची चिंता संयुक्त राष्ट्रांनाही सतावत आहे.

युनायटेड नेशन्सने एका निवेदनात म्हटलं आहे की, शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक हल्ल्याला बळी पडू शकतात. इस्रायलने गाझाच्या दक्षिणेकडील सीमेवर तीन लाखांहून अधिक सैनिक, तोफखाना आणि टँक जमा केले आहेत. मात्र, इस्रायली सैन्य गाझामध्ये कधी प्रवेश करेल आणि हमासच्या विरोधात जमिनीवर कारवाई कधी सुरू करेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

लेबनानमधील ऑस्ट्रेलियाचे माजी राजदूत इयान पार्मेटर यांनी अलजजीराशी बोलताना सांगितलं की, गाझावरील इस्रायलचा जमिनीवर हल्ला या आठवड्याच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. इस्रायलच्या ग्राउंड ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे विश्लेषक पार्मेटर म्हणाले, 'हे स्पष्ट आहे की जर इस्रायल गाझामध्ये गेला तर त्याचे अनेक सैनिकही मारले जातील. 

इस्रायलच्या या कारवाईत गाझाचे नागरिकही मोठ्या संख्येने मारले जाणार आहेत. गाझामधील लोकांना दक्षिणेकडे जाण्याच्या इस्रायलच्या इशाऱ्याबाबत पार्मेटर म्हणाले, 'लोकांना हा परिसर रिकामा करण्याच्या सूचना जारी करून इस्रायल गाझा शहराच्या आत येत असल्याचा इशारा देत आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: israel orders 11 lakh palestinians to move to southern gaza which indicates that idf is going to start ground operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.