इस्रायल- गाझा पट्टी युद्ध, एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 04:11 PM2023-10-08T16:11:34+5:302023-10-08T16:15:51+5:30
Israel-Palestine War: आपले प्रवासी, पायलट आणि विमानातील कर्मचाऱी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
इस्रायल आणि फिलिस्तिनमध्ये संघर्ष सुरु आहे. बॉम्बफेक आणि गोळीबारामुळे एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. Israel-Palestine Conflict मुळे एअर इंडियाने सर्व इस्रायलमधील सर्व उड्डाणांवर १४ ऑक्टोबर पर्यंत बंदी आणली आहे. तेल अवीवहून जाणारी विमाने एअर इंडियाने रद्द केली आहे. आता अन्य विमान कंपन्यादेखील हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आपले प्रवासी, पायलट आणि विमानातील कर्मचाऱी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. विमानांचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जाईल असेही कंपनीने म्हटले आहे. दर आठवड्याला दिल्ली विमानतळावरून पाच विमाने तेल अवीवकडे उड्डाण करतात.
तेल अवीव येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने एअर इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना भारतात आणत आहे. दिल्लीहून तेल अवीवकडे जाणारी फ्लाइट क्रमांक AI139 आणि परतीची फ्लाइट AI140 देखील रद्द करण्यात आली आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्ध भडकू लागले आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5000 रॉकेट डागले. या हल्ल्यात सुमारे 300 इस्रायली लोक मारले गेले आहेत. इस्रायलनेही गाझावर हल्ले केले असून गाझा पट्टीत 230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात 3500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.