ट्रकखाली लपून राहिली, मेल्याचं नाटक केलं पण...; हमासने बॉयफ्रेंडसमोर केली मुलीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 04:12 PM2023-10-11T16:12:07+5:302023-10-11T16:13:35+5:30

आपला जीव वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय इस्रायली महिलेला हमासच्या दहशतवाद्यांनी तिच्या ब़ॉयफ्रेंडसमोर क्रूरपणे गोळ्या घातल्या.

israel palestinian conflict anchors sister who was running to save her life was brutally killed by hamas | ट्रकखाली लपून राहिली, मेल्याचं नाटक केलं पण...; हमासने बॉयफ्रेंडसमोर केली मुलीची निर्घृण हत्या

ट्रकखाली लपून राहिली, मेल्याचं नाटक केलं पण...; हमासने बॉयफ्रेंडसमोर केली मुलीची निर्घृण हत्या

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान एका टीव्ही होस्टच्या बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. शनिवारी दुपारी गाझा पट्टीजवळील एका म्यूझिक कॉन्सर्टमध्ये हमासचे दहशतवादी घुसले होते आणि त्यांनी लोकांवर गोळीबार सुरू केला तेव्हा ही घटना घडली. आपला जीव वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय इस्रायली महिलेला हमासच्या दहशतवाद्यांनी तिच्या ब़ॉयफ्रेंडसमोर क्रूरपणे गोळ्या घातल्या.

न्यूज डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, जिचा मृत्यू झाला ती मॅपल एडम ही इस्रायलमधील प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट मायन एडमची धाकटी बहीण होती. लोकप्रिय न्यूज अँकर आणि 'डान्सिंग विथ द स्टार्स' या शोसाठी प्रसिद्ध असलेली मायन एडमने तिच्या इन्स्टाग्रामवर एक हृदयद्रावक मेसेज पोस्ट केला आणि तिच्या तीन लाख फॉलोअर्सना बहिणीच्या मृत्यूची माहिती दिली.

मायन एडमने सांगितलं की, हल्लेखोरांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात तिची बहीण ट्रकखाली लपली आणि मृत्यू झाल्याचं नाटक केलं. तिने तिच्या बॉयफ्रेंडला पकडून ठेवलं होतं. ज्याच्या पाठीत गोळी लागली होती. सुदैवाने तिचा बॉयफ्रेंड लवकर बरा व्हावा अशी आशा आहे. अपघाताच्या वेळी मॅपलसोबत असलेल्या फोनचा फोटो शेअर करत मायन एडमने लिहिलं की, "शनिवारी दुपारी मॅपल ट्रकखाली लपली. स्वत:ला वाचवण्यासाठी ती तासन्तास हलली नाही पण शेवटी दहशतवाद्यांनी तिला मारून टाकलं."

"तिने काढलेला हा शेवटचा फोटो आहे. हा तिचा फोन आहे. ती आणि तिचा बॉयफ्रेंड रोए गेल्या आठवड्यात एकत्र आले होते. ती जगातील सर्वात आनंदी व्यक्ती होती. जेव्हा ती जमिनीवर पडली होती, तेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिच्या शेजारी पडलेला होता. त्याच्या पाठीत गोळी लागली. त्याने आम्हाला हे सांगितलं. या घटनेने माझ्या कुटुंबाच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत आणि मी कधीही कल्पनाही केली नव्हती अशा वेदनांना आम्ही सामोरे जात आहोत." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: israel palestinian conflict anchors sister who was running to save her life was brutally killed by hamas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.