इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 08:47 AM2024-06-09T08:47:49+5:302024-06-09T08:54:24+5:30

बचाव मोहिमेदरम्यान केलेल्या हल्ल्यांमध्ये २३६ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गाझा अधिकाऱ्याचा दावा

Israel rescues four hostages in operation Gaza officials say killed more than 200 | इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका

इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका

Israel rescued 4 hostages from Gaza, Hamas Palestine: हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासने इस्रायलच्या लोकांना ओलीस ठेवले आहे. तर इस्रायलने पॅलेस्टाईनच्या लोकांना ओलीस ठेवले आहे. दोनही सैन्य आपापल्या नागरिकांना सुरक्षित सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इस्रायलने आपल्या ओलिसांच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून इस्रायलकडून मध्य गाझामध्ये हवाई हल्ले केले जात आहेत. इस्रायलच्या या बचाव मोहिमेचे यश म्हणून शनिवारी चार जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र या बचाव मोहिमेदरम्यान केलेल्या हल्ल्यांमध्ये २३६ नागरिकांचा मृत्यू तर ४०० हून अधिक जखमी झाल्याचे गाझा अधिकाऱ्याने सांगितले.

----

इस्त्रायली हल्ल्यात लहान मुलांसह एकूण २१० पॅलेस्टाइन नागरिक मरण पावले. गाझा आरोग्य अधिकाऱ्याने हा आकडा सांगितला आहे. याच दरम्यान, इस्रायली सैन्याच्या बचाव मोहिमेला यश आले असून नोआ अर्गामनी (२६), अल्मोग मीर जान (२२), आंद्रे कोझलोव्ह (२७) आणि स्लोमी झिव (४१) या चार ओलिसांना वाचवण्यात आले, असे इस्रायली लष्कराने सांगितले. हे लोक गेल्या २४५ दिवसांपासून हमासच्या कैदेत होते. अखेर त्यांची शनिवारी सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

---

---

अर्गमनी हिने सांगितले भयानक अनुभव

ओलिसांपैकी एक असलेल्या अर्गमनी हिला एका म्युझिक फेस्टीवलमधून ओलीस ठेवण्यात आले होते. अर्गमनीच्या अपहरणाचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यात ती एका मोटरसायकलवर दोन पुरुषांच्या मध्ये बसून "मला मारू नका!" असे ओरडत होती. तिची आई लिओराला ब्रेन कॅन्सर आहे आणि तिने आपल्या मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडिओ जारी केला होता. इस्रायली वाहिनीने सांगितले की, अर्गमानीला रुग्णालयात नेण्यात आले आहे, जिथे तिच्या आईवर उपचार सुरू होते. हमासच्या बंदिवासातून सुटल्यानंतर एका व्हिडिओमध्ये, अर्गामनी हिने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितले की ती खूप खुश आणि उत्साही आहे. इतके दिवस हिब्रू ऐकले नव्हते, असेही ती म्हणाली.

राष्ट्राध्यक्ष नेतन्याहू यांनी एका निवेदनात सर्व ओलिसांची सुटका होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे याबद्दल संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले की, ओलिसांची सुटका हे ऑपरेशन धाडसी, उत्तम नियोजनातून अंमलात आणले गेले. राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू यांनी ओलिसांशी चर्चाही केली.

Web Title: Israel rescues four hostages in operation Gaza officials say killed more than 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.