इस्रायलचा गाझातील शाळेवर हल्ला, 19 दहशतवादी ठार; जगभरातून हल्ल्याचा निषेध...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 04:16 PM2024-08-11T16:16:56+5:302024-08-11T16:18:07+5:30
Israel Strike on Gaza: या हल्ल्यात सुमारे 90 निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याचा दावा करण्यात येतोय.
Israel Strike on Gaza : इस्रायल आणि हमास यांच्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने सातत्याने एकमेकांवर हल्ले होत आहेत. अशातच, इस्रायली लष्कराने शनिवारी(दि.10) गाझा येथील एका शाळेवर हल्ला केल्यानंतर जगभरातून इस्रायलवर टीकेची झोड उठली आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनेही निष्पाप नागरिकांच्या हत्येबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. दरम्यान, जगभरातून होत असलेल्या टीकेनंतर आता इस्रायली लष्कराने हा हल्ला करण्याचे कारण सांगितले आहे.
"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल
शाळेत दहशतवाद्यांचा अड्डा
इस्रायली सैन्याने सांगितले की, गाझातील शाळेच्या संकुलात हमासच्या दहशतवाद्यांचा अड्डा होता. तसेच, या ठिकाणी इस्लामिक जिहादच्या सेंट्रल कॅम्प ब्रिगेडचा कमांडर अशरफ जुडाह लपल्याची मिळाली होती. या दहशतवाद्यांना मारण्यासाठी इस्रायलने हल्ला केला, ज्यात 19 दहशतवादी मारले गेले आहेत. दरम्यान, या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. कारण, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यात सुमारे 90 निष्पाप नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
Today, the IDF and ISA struck terrorists operating in a Hamas command and control center, which was embedded inside a mosque in the Al-Taba’een school compound. Following an intelligence investigation, it can be confirmed at this time that at least 19 Hamas and Islamic Jihad… pic.twitter.com/97fw1Q9cHy
— Israel Defense Forces (@IDF) August 10, 2024
इस्रायली सैन्याचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही हमास आणि इस्लामिक जिहादच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. हल्ला करण्यापूर्वी सामान्य नागरिकांना नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलत आहोत. हमासचे दहशतवादी शाळेच्या इमारतींचा वापर लष्करी कारवायांसाठी करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देणे कठीण झाले आहे.
आमची बदनामी करण्याचा प्रयत्न; हिंडेनबर्गने केलेल्या नव्या आरोपांवर अदानी ग्रुपचे स्पष्टीकरण