संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायली राजदुताने दाखवला 'तो' फोन नंबर; नक्की गौडबंगाल काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 15:04 IST2023-12-13T15:04:10+5:302023-12-13T15:04:56+5:30
UN मध्ये युद्धविरामाची मागणी करणारा ठराव १५३ देशांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आला

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायली राजदुताने दाखवला 'तो' फोन नंबर; नक्की गौडबंगाल काय?
Israel vs Hamas, United Nations : संयुक्त राष्ट्र महासभेने मंगळवारी गाझामध्ये युद्धविरामाची मागणी करणारा ठराव मंजूर केला. त्याला १५३ देशांनी पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला विरोध करताना इस्रायली राजदूत म्हणाले की पॅलेस्टाइन गट हमास आपली शस्त्रे खाली ठेवेल, तेव्हाच कायमस्वरूपी युद्धविराम होईल. इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी सर्वसाधारण सभेला सांगितले की, जर तुम्हाला युद्धविराम हवा असेल तर गाझामधील हमासच्या कार्यालयांना फोन करा आणि याह्या सिनवारला यासंबंधी विचारा. त्यांना सांगा की जेव्हा हमास आपली शस्त्रे खाली ठेवून शरणागती पत्करेल आणि सर्व ओलिसांची सुटका करेल, तेव्हाच युद्धविराम होईल जो कायमस्वरूपी टिकेल.
याह्या सिनवार हा हमासचा गाझा पट्टीचा नेता आहे आणि इस्रायलने जाहीर केले आहे की त्याला पकडणे हा त्याच्या मुख्य उद्देशांपैकी एक आहे. एर्डनने याह्या सिनवारच्या कार्यालयाचा फोन नंबर दर्शविणारे एक चिन्ह देखील प्रदर्शित केले आणि उपस्थित सदस्यांना सांगितले की ज्यांना खरोखरच युद्धविरामाची काळजी आहे त्यांनी या नंबरवर कॉल करण्यास सांगितले.
गिलाड एर्डन काय म्हणाले?
"मला प्रामाणिकपणे माहित नाही की कोण या युद्धाकडे कसे पाहते? हमासचा निषेध न करणारे आणि उल्लेख न करता बोलणारे असे सदस्य येथे आहेत. युद्धाचे काय परिणाम असतात हे तुम्हाला पण माहिती आहे, मलाही कल्पना आहे. त्यामुळे जर तुम्हाला पूर्णपणे युद्धविराम हवा असेल तर या फोन नंबरवर ही गोष्ट पटवून द्या. हा गाझा येथील हमास कार्यालयाचा फोन नंबर आहे. आपण सर्व कॉल करू शकता आणि युद्धविरामाची गोष्ट पटवून देऊ शकता.
१५३ देशांनी यूएन ठरावाला पाठिंबा दिला, १० जणांनी विरोधात मतदान केले आणि 23 जण अनुपस्थित राहिले. युनायटेड स्टेट्स, इस्रायल, ऑस्ट्रिया, झेकिया, ग्वाटेमाला, लायबेरिया, मायक्रोनेशिया, नाउरू, पापुआ न्यू गिनी आणि पॅराग्वे या प्रस्तावाला विरोध करणारे देश आहेत.