इस्रायल इराणच्या अणुस्थळांना नष्ट करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लाही व्यर्थ ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:17 IST2025-02-17T12:14:14+5:302025-02-17T12:17:15+5:30
२०२४ मध्ये इराण आणि इस्रायल अनेक वेळा समोरासमोर आले आणि युद्धाची शक्यता होती, पण दोन्ही बाजूंनी हल्ल्यांनंतर परिस्थिती शांत झाली. आता जर अणु तळांवर हल्ले झाले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

इस्रायल इराणच्या अणुस्थळांना नष्ट करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लाही व्यर्थ ठरणार
गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. तर २०२५ या वर्षाची सुरुवात इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीने झाली, तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण, या दोन्ही देशामधील युद्ध पुन्हा कधीही वाढू शकते. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालांमध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
'ड्रीम अमेरिका' पूर्ण करण्यासाठी ५५ लाख खर्च केले; ८ महिन्यात दोनदा डिपोर्ट झाला
या अहवालामध्ये म्हटले आहे की, इराणच्या अणुस्थळांवर या वर्षी इस्रायलकडून हल्ला होऊ शकतो. जर असे झाले तर मध्यपूर्वेत मोठे युद्ध होऊ शकते. याशिवाय तिसऱ्या महायुद्धाचा धोका असू शकतो. २०२४ मध्ये, इराण आणि इस्रायल अनेक वेळा समोरासमोर आले आणि युद्धाची शक्यता होती, पण दोन्ही बाजूंनी काही हल्ल्यांनंतर परिस्थिती शांत झाली. आता जर अणुप्रकल्पांवर हल्ले झाले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
इस्रायली लष्कराची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल आणि इराणमध्ये शांतता करार हवा आहे, पण इस्रायलला हे नको आहे. त्यांचे लक्ष्य इस्रायलची अणु क्षमता नष्ट करणे आहे. इराणमध्ये राजवट बदलण्यासाठी इस्रायल निधी पुरवू शकते आणि राजकीय युद्ध होऊ शकते, असे मानले जाते. याआधीही इस्रायली सुरक्षा दलांनी इराणी लष्करी तळांवर हल्ला केला होता. आता नवीन हल्ले पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असू शकतात. यावेळी, इराणच्या अणुस्थळांवर इस्रायल हल्ला करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
इराणमध्ये सध्याच्या राष्ट्रपतींची सत्तेवरील पकड कमकुवत झाली आहे. याचा फायदा इस्त्रायलला होऊ शकतो. अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इराण देखील कमकुवत झाला आहे. जर इस्रायलला इराणच्या अणुस्थळांना पूर्णपणे नष्ट करायचे असेल तर ते अमेरिकन सैन्याच्या मदतीशिवाय ते करू शकत नाहीत, असा दावा अहवालात केला आहे.