हमासच्या तळांवर इस्रायलचा हल्ला, पुन्हा तणाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 12:48 PM2017-12-09T12:48:00+5:302017-12-09T12:52:35+5:30
हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे
Next
ठळक मुद्देगाझामधील संतप्त लोकांच्या जमावावर इस्रायली फौजांनी शुक्रवारी केलेल्या गोळीबारामध्ये दोन पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.हमासच्या तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 25 लोक जखमी झाले आहेत.
जेरुसलेम- हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे. इस्रायलच्या दक्षिण भागामध्ये काल गाझामधून रॉकेटस डागण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासच्या तळांवर हल्ले केले.
Israel airstrikes strike Gaza Strip during Palestinian 'day of rage' https://t.co/LICc1g2Kh2pic.twitter.com/dvSHoIdYOY
— dwnews (@dwnews) December 9, 2017
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव वाढीला लागला आहे. इस्रायलने जेरुसलेमला नेहमीच आपली राजधानी मानले आहे. तर पॅलेस्टाइनने पूर्व जेरुसलेमला आपली राजधानी मानले होते. 1967 साली झालेल्या युद्धामध्ये इस्रायलने पूर्व जेरुसलम जिंकून घेतले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्यामुळे यावर पुन्हा चर्चा सुरु होऊन मध्यपूर्वेतील स्थिती बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये बहुतांश देशांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला एकाकी पाडले आहे..
BREAKING 10 wounded in Israeli strike on Gaza targets, Palestinians report https://t.co/07ReCf2jWO
— Haaretz.com (@haaretzcom) December 8, 2017
गाझामधील संतप्त लोकांच्या जमावावर इस्रायली फौजांनी शुक्रवारी केलेल्या गोळीबारामध्ये दोन पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तसेच हमासच्या तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 25 लोक जखमी झाले आहेत. शनिवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टाइनचे किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच एक रॉकेट इस्रायलने पाडल्याची माहिती मिळाली आहे.