फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:23 PM2024-10-02T12:23:46+5:302024-10-02T12:26:34+5:30

या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्य एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून 1,00,000 हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, इस्रायलची संपूर्ण जगभरात नाचक्की झाली होती.

Israeli Attack mossad agent took Iran's nuclear weapon secret document A big claim by the former president mahmood ahmadinejad | फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा

फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा

इस्रायलची मोसाद ही जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे. गाझामध्ये हमास असो, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह असो अथवा इराण असो इस्रायली गुप्तचर संस्थेचे डावपेच नेहमीच वरचढ ठरले आहेत. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह एका बंकरमध्ये लपून बसलेलेला आहे, याची माहिती त्यांना आधीपासूनच होती. 27 सप्टेंबरला इस्रायलने हवाई हल्ल्यात नसरल्लाह संपवला. यावरूनच इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद किती प्रबळ आहे याची कल्पना येऊ शकते. महत्वाचे म्हणजे, यासंघटनेने यापूर्वीही, हमास, हिजबुल्लाह आणि इराणचे अनेक प्लॅन फेल केले आहेत. यातच आता मोसाद इराणचे न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन भूर्र झाल्याचा दावा केला जात आहे.

इराणच्या माजी राष्ट्रपतींचे खळबळजनक दावे -
इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत इस्रायलसंदर्भात अनेक मोठे दावे केले आहेत. महमूद अहमदीनेजाद म्हणाले, काही वर्षांपूर्वी इस्रायली गुप्तचर संस्थेचे प्रयत्न फेल करण्याच्या हेतूने इराणने एक गुप्तचर युनिट तयार केले  होते. जिचा हेड नंतर एक इस्रायली एजन्ट निघाला. एवढेच नाही तर, युनिटच्या हेड शिवाय डिव्हीजनचे आणखी 20 लोकही इस्रायली एजन्सी मोसादचे एजन्ट होतते, असेही महमूद यांनी सांगितले.

याशिवाय, परदेशी एजन्ट्सद्वारे 2018 मध्ये इराणच्या न्यूक्लिअर डॉक्युमेन्ट्सची चोरी आणि मुख्य न्यूक्लिअर सायंटिस्ट्सच्या हत्येमागेही गुप्तचर एजन्सींचा हात असल्याचा दावाही इराणच्या माजी राष्ट्रपतींनी केला आहे. तसेच, इस्रायली एजन्सीने त्यांच्या देशाच्या गुप्तचर सेवांवर हल्ला केल्याचेही इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी कबूल केले आहे. 

इराणच्या न्यूक्लिअर कार्यक्रमाचे डॉक्युमेन्ट कसे गायब झाले? सर्वच सांगितलं -
इराणचा न्यूक्लिअर प्रोग्रॅम आजपर्यंत यशस्वी होऊ शकलेला नाही. त्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे इस्रायल. कारण इराण न्यूक्लिअर संपन्न देश होणे इस्रायलच्या दृष्टीने घातक आहे. यासंदर्भात बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 2018 मध्ये मोठा खुलासा केला होता. ते म्हणाले होते, इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमचे मोठ्या प्रमाणावर डॉक्युमेन्ट इस्रायली एजंट्सने मिळवले आहेत. यानंतर, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनेही या वृत्ताला दुजोरा देत, तेहरानमधील कारवाईतून कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे म्हटले होते.

या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्य एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून 1,00,000 हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, इस्रायलची संपूर्ण जगभरात नाचक्की झाली होती.

 

Web Title: Israeli Attack mossad agent took Iran's nuclear weapon secret document A big claim by the former president mahmood ahmadinejad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.