इस्रायलचा हमासवर सर्वात मोठा हल्ला; दहशतवाद्यांचा म्होरक्या इस्माइलच्या घरावर मिसाईल अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 05:20 PM2023-11-04T17:20:00+5:302023-11-04T17:21:29+5:30

Israel Palestine Conflict : इस्रायली सैन्याने हमासचा प्रमुख इस्माइल हानिया यांच्या घरावर मिसाईल अटॅक केल्याचं सांगण्यात येत आहे.

israeli drone fires missile at gaza house of hamas chief ismail haniyeh israel hamas war | इस्रायलचा हमासवर सर्वात मोठा हल्ला; दहशतवाद्यांचा म्होरक्या इस्माइलच्या घरावर मिसाईल अटॅक

इस्रायलचा हमासवर सर्वात मोठा हल्ला; दहशतवाद्यांचा म्होरक्या इस्माइलच्या घरावर मिसाईल अटॅक

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या 29 वा दिवस आहे. इस्रायली सैन्याने हमासचा प्रमुख इस्माइल हानिया यांच्या घरावर मिसाईल अटॅक केल्याचं सांगण्यात येत आहे. इस्त्रायली ड्रोनने इस्माईल हानियाच्या गाझा येथील घरावर मिसाईल डागल्याची माहिती शनिवारी अल-अक्सा रेडिओने दिली. मात्र, या हल्ल्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. त्याचं कुटुंब तिथे राहत होतं, परंतु हल्ल्याच्या वेळी कोणीही सदस्य उपस्थित होता की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

हमासचा प्रमुख इस्माइल हानिया 2019 पासून तुर्की आणि कतारमधील गाझा पट्टीच्या बाहेर राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा शहराला चारही बाजूंनी घेरलं आहे. दोन दिवसांत हमासचे 150 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. अमेरिकन ड्रोन बोगद्याजवळ ओलीस ठेवलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. जेव्हापासून इस्रायली सैन्याने गाझावर थेट हल्ला केला तेव्हापासून गाझाला सर्व बाजूंनी वेढले जात आहे. इस्रायलने गाझाचे दोन भाग केले आहेत. 

इस्त्रायलने दावा केला आहे की त्यांनी आतापर्यंत 1000 हमास दहशतवाद्यांना ठार केले आहे. मृतांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. फक्त गाझामध्ये 10 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत, तर इस्रायलमध्ये 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, त्याचे सैनिक हमासवर शस्त्रे आणि विमानांनी हल्ला करत आहेत. प्रामुख्याने चार ठिकाणे लक्ष्य आहेत. एक हमास कमांड सेंटर, दोन लॉन्चिंग पोझिशन्स, तीन बोगदे आणि चौथे अँटी-टँक क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र. 

इस्रायली लष्कराने आपल्या लष्करी कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी हवाई दल आणि नौदलाने केलेले हल्ले दाखवले आहेत. दुसरीकडे हमासने एक व्हिडीओ जारी करून आपले लढवय्ये इस्रायली सैन्याचा कसा सामना करत आहेत हे सांगितले आहे. युद्धात गाझा पट्टीच्या जमिनीवर उतरलेले इस्रायली सैन्य दहशतवादी लपून बसेल अशा प्रत्येक ठिकाणी हल्ले करत आहेत. 

इस्रायलने गाझामधील सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफा येथे हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर रुग्णालयाबाहेर लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. ओरडत आहेत. इस्त्रायली हल्ल्यात जखमी झालेले लोक, अनेक कार आणि रुग्णवाहिकांमध्ये इकडे-तिकडे पडलेले लोक दिसत आहेत. सर्वत्र आरडाओरडा सुरू आहे. काही लोक जखमींना घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा इस्रायली सैन्याने थेट अल-शिफा बाहेर रुग्णवाहिकांच्या ताफ्यावर हल्ला केला.
 

Web Title: israeli drone fires missile at gaza house of hamas chief ismail haniyeh israel hamas war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.