गाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:26 AM2021-05-17T09:26:46+5:302021-05-17T09:29:52+5:30

Israel Airstrike : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू आहे संघर्ष.

Israeli fighter jets unleashed a series of heavy airstrike at Gaza city Hamas Palestine | गाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग

गाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू आहे संघर्ष.सोमवारी इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात गाझा शहरातील अनेक ठिकाणी एअरस्ट्राईक।

इस्त्रायली लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा गाझा शहरावर बॉम्ब हल्ला केला आहे. सोमवारी सकाळी इस्त्रायकडून गाझा पट्टीतील विविध ठिकाणी दहा मिनिटं बॉम्ब डागण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत निरनिराळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एअर स्ट्राईक केला. सोमवारी सकाळी शहराच्या दक्षिण भागात दहा मिनिटं सातत्यानं बॉम्ब डागण्यात आले. हा एअरस्ट्राईक २४ तासांपूर्वी करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकपेक्षाही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये ४२ पॅलेस्टीनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, इस्रायलच्या डिफेन्स फोर्सनं आपल्या दिलेल्या वक्तव्यात IDF फायटर जेट्स गाझा पट्टीतील दशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचं म्हटलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान गाझा पट्टीत इस्रायलनं रविवारी मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव केला होता. या हवाई हल्ल्यात ४२ पॅलेस्टीनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये काही इमारतींचंही मोठं नुकसान झालं होतं. 

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील भीषण संघर्ष अद्यापही सुरु आहे. अशातच इस्रायली सैन्याने गाझावर केलेल्या भीषण हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती रविवारी समोर आली होती. (israel palestine clash israeli army targets home of top hamas leader in gaza) इस्रायलच्या लढाऊ विमानांद्वारे हवाई हल्ले सुरूच आहेत. तर, हमासदेखील सातत्याने रॉकेट हल्ला करत आहे. हमासने सुमारे २ हजार रॉकेट डागले असल्याचा दावा इस्रायलने केला होता. यापूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली होती. सेना प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल हिदाई जिल्बरमॅन यांनी यासंदर्भातील माहिती इस्रायली रेडिओला दिली. 

मीडिया ऑफिसेसचे मोठे नुकसान

इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील असोसिएट प्रेस, अल जझीरासह अन्य मीडिया ऑफिसेसचे मोठे नुकसान झाले आहे. मीडिया ऑफिसेसची बिल्डिंग इस्त्रायलच्या हल्ल्यात अक्षरश: उद्ध्वस्त झाली. इस्रायलच्या सैन्याने गाझा शहरातील काही बिल्डिंग रिकाम्या करण्याबाबत इशारा दिला होता. याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात १२ मोठ्या बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या. 

Web Title: Israeli fighter jets unleashed a series of heavy airstrike at Gaza city Hamas Palestine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.