इस्त्रायलचे आरोग्यमंत्री आन् त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, दोघेही आयसोलेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 07:30 PM2020-04-02T19:30:09+5:302020-04-02T19:43:47+5:30

जेरुसलेम - इस्त्रायलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयाने ...

Israeli health minister yaakov litzman and his wife have corona positive sna | इस्त्रायलचे आरोग्यमंत्री आन् त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, दोघेही आयसोलेशनमध्ये

इस्त्रायलचे आरोग्यमंत्री आन् त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, दोघेही आयसोलेशनमध्ये

Next
ठळक मुद्दे71 वर्षांचे आहेत आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन इस्त्रायलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू 5 आठवड्यात कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्या दुप्पड


जेरुसलेम - इस्त्रायलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली. यासंदर्भात तेथील आरोग्य विभागाने म्हटले आहे, की 71 वर्षांचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी बरे आहेत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्यप्रकारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

इस्त्रायलच्या एका संकेस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. लिट्झमॅन हे इस्त्रायलमधील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, घरून त्यांचे काम सुरूच ठेवतील असे त्यांच्या कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

मोसादचे प्रमुखही आयसोलेशनमध्ये -
इस्त्रायलच्या ब्रॉडकास्ट एजंसीने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या प्रमुखांनी लिट्झमॅन यांची भेट घेतली होती. यानंतर आता तेही आयसोलेशनमध्ये गेले आहेत.

इस्त्रायलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  येथे कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तेथे 6000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुले आतापर्यंत जगात 47 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 9 लाख 40 हजार लोकांना याची लागण झाली आहे. तसेच जवळपास 1 लाख 94 हजार लोक बरे झाले आहेत.

5 आठवड्यात कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्या दुप्पड -

याबाबत डब्ल्यूएचओचे संचालक अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस हळूहळू चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे.अशातच कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढणार आहे. कोरोनाचा वाढता आकडा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनणार आहे. मागील 5 आठवड्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली असल्याचं त्यांनी सांगितले.
 

Web Title: Israeli health minister yaakov litzman and his wife have corona positive sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.