इस्रायलनं गाझावर केला एअर स्ट्राइक, 100 ठिकाणी टाकल्या मिसाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 09:22 AM2019-03-16T09:22:33+5:302019-03-16T09:26:54+5:30
इस्रायलच्या सैन्यानं गाझामध्ये 100 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे.
जेरुसलेमः इस्रायलच्या सैन्यानं गाझामध्ये 100 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. इस्रायलनं ही कारवाई राजधानी तेल अविववर झालेल्या 4 रॉकेट हल्ल्यानंतर केली आहे. त्यातील 3 रॉकेट इस्रायलच्या रॉकेट डिफेन्स सिस्टीमनं निष्क्रिय केले. एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या विमानांनी हमासच्या सुरक्षा चौक्यांवर मिसाइल डागल्या असून, इस्रायलनेच याची माहिती सार्वजनिक केली आहे. इस्रायलच्या दाव्यानुसार, त्यांनी हमासच्या 100 लष्करी तळांना टार्गेट केले आहे. हे एअर स्ट्राइक दक्षिणी गाझाच्या खान युनिस भागात करण्यात आलं आहे. हे ठिकाण गाझाच्या राजधानीपासून 25 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे.
इस्रायलची राजधानी तेल अविववर 2014नंतर पहिल्यांदाच रॉकेटनं हल्ला करण्यात आला. 9 एप्रिलला इस्रायलमध्ये निवडणुका आहेत, त्याच पार्श्वभूमीवर इस्रायल सेनेनं ही कारवाई केली आहे. तत्पूर्वी भारतानंही 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
We hit 100 Hamas military targets in Gaza in response to the rockets they fired at Israeli civilians. Among them:
— Israel Defense Forces (@IDF) March 15, 2019
• Underground rocket manufacturing site
• HQ responsible for orchestrating Hamas terrorism in Judea & Samaria
• Hamas center of unmanned aerial aircraft#StopHamaspic.twitter.com/Iy3DwpNpTU
बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांना भारताच्या एअर स्ट्राइकमधून लक्ष्य करण्यात आलं होतं. ज्यात 200हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. या हल्ल्यातही इस्रायलकडून खरेदी करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयानं 54 इस्रायली HAROP ड्रोन खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भारत आणि इस्रायलमधील संबंध आणखी वृद्धिंगत झाले असून, भारताला आत्मविश्वासही कमालीचा दुणावला आहे.