"आता गाझा हे दोन देश..."; हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 10:24 AM2023-11-04T10:24:19+5:302023-11-04T10:25:48+5:30

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या संरक्षण दलाचे म्हणणे आहे की, त्यांनी उत्तर गाझा पट्टीमध्ये एका रुग्णवाहिकेवर हवाई हल्ला केला आहे. ही रुग्णवाहिका युद्ध क्षेत्राजवळील हमास सेलद्वारे वापरली जात होती.

israeli military spokesperson rear adm daniel hagari holds briefing amid war with hamas says there are two gazas | "आता गाझा हे दोन देश..."; हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्याचं मोठं विधान

"आता गाझा हे दोन देश..."; हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्याचं मोठं विधान

इस्रायल आणि हमास यांच्यात 29 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून गोळीबार, बॉम्बफेक आणि रॉकेट-क्षेपणास्त्रांचा मारा सुरू आहे. याच दरम्यान, इस्रायलचे सैन्याचे प्रवक्ते रियर एडमिरल डॅनियल हगारी यांनी मोठा दावा केला आहे. आता दोन गाझा आहेत. म्हणजे आता गाझा हे दोन देश आहेत असं म्हटलं आहे. उत्तर गाझामध्ये एका रुग्णवाहिकेला लक्ष्य करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तेथे हमासचे दहशतवादी रुग्णवाहिकांमधून शस्त्रे पुरवत होते.

आयडीएफचे प्रवक्ते हगारी म्हणाले, आम्ही जमिनीवर आणि जमिनीखाली (बोगदे) हमासच्या फील्ड कमांडर्सचा शोध घेत आहोत आणि त्यांना संपवत आहोत. युद्धाच्या सुरुवातीपासून, आम्ही रेजिमेंट कमांडर आणि हमासच्या ब्रिगेड कमांडर रँकच्या 10 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. तेच लोक आहेत ज्यांनी 7 ऑक्टोबर रोजी भयंकर हत्याकांडाची योजना आखली होती. आमचे सैनिक युद्धात पुढे जात आहेत. ते जमिनीवरील आणि भूमिगत दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करत आहेत आणि दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.

हगारी पुढे म्हणाले, गाझामधील युद्धावर आमचं लक्ष आहे. हमासचा खात्मा करण्यावर आमचा भर आहे. आता दोन गाझा आहेत. आम्ही तिथे हल्ले करत आहोत. जो कोणी दहशतवादी तिथे पोहोचेल त्याचा खात्मा केला जाईल. आमच्या ऑपरेशन्समधील हे अधिक सुरक्षित क्षेत्र आहे. आमचे लक्ष उत्तर गाझावर आहे. तेथे एक अतिशय गुंतागुंतीची आणि कठीण लढत आहे. आयडीएफ दलांना स्फोटकांचा साठा सापडला आहे.

उत्तर गाझामध्ये रुग्णवाहिकेवर हवाई हल्ला

इस्रायलच्या संरक्षण दलाचे म्हणणे आहे की, त्यांनी उत्तर गाझा पट्टीमध्ये एका रुग्णवाहिकेवर हवाई हल्ला केला आहे. ही रुग्णवाहिका युद्ध क्षेत्राजवळील हमास सेलद्वारे वापरली जात होती. आयडीएफने या हल्ल्यात हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. आमच्याकडे अशी माहिती आहे की हमास आपल्या दहशतवादी कार्यकर्त्यांना आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा रुग्णवाहिकांमधून करत असे. हे क्षेत्र युद्धक्षेत्र आहे यावर आम्ही भर देतो. परिसरातील नागरिकांना त्यांच्या सुरक्षेसाठी दक्षिणेकडे स्थलांतरित होण्यास वारंवार सांगितले जात आहे असं म्हटलं आहे. 

"उत्तर भागात तणाव, इस्रायली सैनिक मैदानात"

आयडीएफचे म्हणणे आहे की, त्यांनी युद्धाच्या सुरुवातीपासून 10 हमास ब्रिगेड आणि बटालियन कमांडर मारले आहेत. आयडीएफचे प्रवक्ते रियर एडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, हमासच्या फील्ड कमांडर्सना ठार मारण्यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. हिजबुल्लाहच्या वारंवार हल्ल्यांदरम्यान उत्तरेत तणाव असूनही सैन्य गाझा पट्टीवर लक्ष केंद्रित करत आहे. हमासचा नाश करणे आणि ओलीस ठेवलेल्यांना परत आणणे हे लक्ष्य आहे. 
 

Web Title: israeli military spokesperson rear adm daniel hagari holds briefing amid war with hamas says there are two gazas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.