शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 02:12 PM2024-10-04T14:12:08+5:302024-10-04T14:21:05+5:30
आईचा आपल्या ९ महिन्यांच्या मुलाला वाचवताना मृत्यू झाला. तिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाचा जीव वाचवला आहे.
तेल अवीवच्या जाफा भागात झालेल्या हल्ल्यात एका इस्रायली महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन हल्लेखोरांनी M16 रायफल आणि चाकू वापरून लोकांना लक्ष्य केल्याने जवळपास १६ जण जखमी झाले. हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मोहम्मद मेसेक आणि अहमद हिमौनी अशी हल्लेखोरांची नावं आहेत.
पोलीस आणि नागरिकांनी तत्काळ प्रत्युत्तर देत हल्लेखोरांना घटनास्थळीच गोळ्या घातल्या. मोहम्मद मेसेकचा जागीच मृत्यू झाला, तर अहमद हिमौनी गंभीर जखमी झाला. सीगेव-विगडर नावाच्या इस्रायली आईचा आपल्या ९ महिन्यांच्या मुलाला वाचवताना मृत्यू झाला. तिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाचा जीव वाचवला आहे.
One of the victims from yesterday’s terrorist attack in Tel Aviv, Inbar Segev-Vigder, murdered while shielding her 9 month old son Ari.
— Israel ישראל (@Israel) October 2, 2024
She saved his life.
There are no words. Only heartbreak 💔 .
May the memory of the victims be a blessing. pic.twitter.com/3nI2jLzem7
२०२३ मध्ये तिचं लग्न झालं. सीगेव-विगडरचा नवरा यारी म्हणाला, "मी गाझामध्ये काम करत होतो आणि आमच्या मुलाच्या जन्माच्या वेळी मी तिच्यासोबत राहायला आलो. ती माझी प्रिय व्यक्ती होती आणि एक महान आई होती." एका ट्विटर अकाऊंटवरून तिचा फोटो शेअर करण्यात आला असून तिने आपल्या मुलाचा जीव वाचवला. शब्दच नाहीत असं म्हटलं आहे.
"हे युद्ध थांबवा..." असं एका युजरने म्हटलं आहे. तसेच "आईचे प्रेम ही देवाची सर्वात सुंदर कला आहे". "आईच्या आत्म्याला शांती लाभो. हे युद्ध आधी थांबवायला हवं होतं, पण हा अहंकार आणि हट्टीपणाचा हा परिणाम आहे" अशा लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या हृदयद्रावक घटनेने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.