राष्ट्रपतींचे इस्रायली संसदेत शलोम-नमस्ते

By admin | Published: October 14, 2015 11:31 PM2015-10-14T23:31:12+5:302015-10-14T23:31:12+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण करून एक नवा इतिहास रचला आहे. भारत आणि इस्रायल यांनी आपले मैत्रीसंबंध कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक बळकट करण्याची गरज

The Israeli parliament of the President of Shalom-Namaste | राष्ट्रपतींचे इस्रायली संसदेत शलोम-नमस्ते

राष्ट्रपतींचे इस्रायली संसदेत शलोम-नमस्ते

Next

जेरुसलेम : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण करून एक नवा इतिहास रचला आहे. भारत आणि इस्रायल यांनी आपले मैत्रीसंबंध कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी या भाषणातून प्रकर्षाने मांडली.
हिब्रूमध्ये नमस्काराला असणाऱ्या शलोम आणि भारतीय नमस्ते अशा दोन शब्दांनी भाषणाची सुरुवात करून राष्ट्रपतींनी उपस्थित संसद सदस्यांची मने जिंकली. आपल्या भाषणामध्ये मुखर्जी यांनी इस्रायलने शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या प्रगतीची वाहवा केली. भारत व इस्रायलने शेती व औद्योगिक क्षेत्रात एकत्र प्रयत्न करायला हवेत असेही सांगितले. २००० वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय भारतामध्ये आले आणि भारतीय समाजात मिसळून समजाचा एक भाग बनून गेले याचा उल्लेखही त्यांनी केला. नेसेटमध्ये भाषण देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती झाल्यामुळे आपण सन्मानित झालो आहोत असेही ते म्हणाले. मात्र, राष्ट्रपतींनी भाषणात पॅलेस्टाईनचा एकदाही उल्लेख केला नाही.
इस्रायलभेटीमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माऊंट हर्झेलवरच्या होलोकॉस्ट मेमोरियलमध्ये जाऊन श्रद्धांजलीही अर्पण केली. (वृत्तसंस्था)

हुमुस आणि हमास
हुमुस हा मध्यपूर्व आणि इस्रायलमध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हुमुस भारतीय लोकांना फार आवडतो असे विधान केले. मात्र हुमुसचा उच्चार हमास (पॅलेस्टाईनमधील संघटना) असा केल्यामुळे इस्रायली खासदार एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. पण राष्ट्रपतींना हुमुस म्हणायचे असल्याचे समजताच क्षणातच त्यांचे समाधान झाले.
दहशतवाद हा कोणत्याही प्रकारे थांबविलाच पाहिजे. भारतीय लोकांचे इस्रायलमध्ये नेहमीच स्वागत होईल अशा सकारत्माक वाक्यावर नेत्यानाहू यांनी भाषण संपविले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांनी आपल्या भाषणात पॅलेस्टाईनचा उल्लेख केला नसला तरी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी सर्व भाषण पॅलेस्टाईन पुरस्कृत दहशतवादावरच केले. अल अक्सा मशीद आम्ही उद्ध्वस्त करणार अशा खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत. पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना दिशाभूल करीत आहेत. मात्र, आम्ही धार्मिक भावनांचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो.

Web Title: The Israeli parliament of the President of Shalom-Namaste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.