इस्नयली विमानांचा गाझापट्टीवर बॉम्बहल्ला; 4 दिवसांत 100 ठार

By admin | Published: July 12, 2014 01:44 AM2014-07-12T01:44:21+5:302014-07-12T01:44:21+5:30

इस्नयलचे गाझा पट्टीवर बॉम्बहल्ले करण्याचे सत्र शुक्रवारी चौथ्या दिवशीही चालू असून, त्यात 1क् पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

Israeli plane bombing in Gaza 100 killed in 4 days | इस्नयली विमानांचा गाझापट्टीवर बॉम्बहल्ला; 4 दिवसांत 100 ठार

इस्नयली विमानांचा गाझापट्टीवर बॉम्बहल्ला; 4 दिवसांत 100 ठार

Next
गाझा - जेरूसलेम : इस्नयलचे गाझा पट्टीवर बॉम्बहल्ले करण्याचे सत्र शुक्रवारी चौथ्या दिवशीही चालू असून, त्यात 1क् पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. गेल्या चार दिवसांत मृत होणा:या पॅलेस्टिनींची संख्या आता 1क्क् झाली आहे, तर 6क्क् लोक जखमी आहेत. मृतांत नागरिक, महिला व लहान मुलांचा समावेश आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी आता लेबनानवरून इस्नयलवर रॉकेट हल्ला करीत आहेत. लेबनानवरून मारा केलेले एक रॉकेट इस्नयलच्या पेट्रोल स्टेशनवर असणा:या इंधनाच्या टँकरवर आदळले असून, त्यामुळे मोठी आग भडकली आहे. अश्दोद शहरात ही घटना  घडली असून त्यात आठजण जखमी  झाले असून, त्यातील एक गंभीर जखमी आहे. 
इस्नयलच्या नेत्यांनी पलेस्टीनचा रॉकेट हल्ला मोडून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी लष्करी हल्ला करण्याचेही संकेत दिले आहेत. 2क् हजार राखीव सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्नयलच्या लष्कराने शुक्रवारी हवाई व आरमारी हल्ला केल्याचे सांगितले, पण त्याचे तपशील देण्यात आलेले नाहीत. 
इस्नयलच्या हवाई हल्ल्यात शुक्रवारी 1क् जण मरण पावले, असे पॅलेस्टिनच्या आरोग्य मंत्रलयाने म्हटले आहे. रफा शहरात घन्नाम कुटुंबाच्या घरावर बॉम्बहल्ला झाला असून त्यात पाचजण मरण पावले आहेत. रफा शहरातील एक रागंते बाळही बॉम्बच्या जखमामुळे मरण पावले आहे. 
गाझा शहरातील एका इमारतीवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात एक डॉक्टर मरण पावला आहे. पॅलेस्टीनच्या रॉकेट हल्ल्यामुळे इस्नयलमध्ये जीवित हानी झालेली नाही. अमेरिकेने इस्नयलला हवाई हल्ल्यातून बचावासाठी दिलेल्या आयर्न डोममुळे या हल्ल्यापासून बचाव झाला आहे.  
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्नयलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी टेलिफोनवरून संवाद साधला असून, युद्ध थांबण्यासाठी हमासशी वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. नेतान्याहू यांना ओबामांनी काय सांगितले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; पण हमासशी युद्धबंदी करण्याचा विचार नसल्याचे सांगितले आहे. त्याउलट ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एजचा आणखी विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. 
लेबनानमधून इस्नयलवर दोन रॉकेटचा मारा करण्यात आला आहे, पण हे काम कोणी केले हे अद्याप स्पष्ट नाही. इस्नयलच्या लष्कराचा प्रवक्ता लेफ्ट. कर्नल पीटर लर्नर यांच्या मते             ही नवी आघाडी तात्पुरती आहे              की कायमची हे अद्याप कळलेले    नाही. 
गाझापट्टीच्या आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार गेला आठवडाभर इस्नयलक डून होणा:या बॉम्बहल्ल्यात 1क्क् पॅलेस्टिनी ठार झाले असून, 6क्क् जखमी झाले आहेत. 3क्क् घरे पूर्णपणो नष्ट झाली आहेत किंवा मोडकळीस आली आहेत. गाझा पट्टीवरील 2 हजार नागरिक बेघर झाले आहेत.  (वृत्तसंस्था)
 
4इस्नयलचे हवाई हल्ले असेच सुरू राहिल्यास इस्नयलच्या बेन गुरीयन विमानतळावर रॉकेट हल्ले केले जातील. कारण या विमानतळावरुन लष्करी विमानेही उड्डाण करतात . त्यामुळे हे विमानतळ हे आमचे लक्ष्य असेल असे हमास संघटनेने म्हटले आहे, जेरुसलेम पोस्ट या वृत्तपत्रत हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
 

 

Web Title: Israeli plane bombing in Gaza 100 killed in 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.