इस्रायलच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबत पाठवली जिवंत गोळी, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:14 PM2022-04-27T22:14:08+5:302022-04-27T22:14:30+5:30

Naftali Bennett : पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचा तपास सुरू केल्याचे इस्त्रायली पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

israeli prime minister naftali bennett family receive a letter containing death threat and a live bullet | इस्रायलच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबत पाठवली जिवंत गोळी, तपास सुरू

इस्रायलच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबत पाठवली जिवंत गोळी, तपास सुरू

googlenewsNext

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट  (Naftali Bennett) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अज्ञातांनी केवळ पत्र पाठवून पंतप्रधानांना धमकावले नाही, तर थेट बंदुकीची एक जिवंत गोळीही पाठवली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, मजबूत सुरक्षा व्यवस्थेसाठी इस्रायलला जगभर ओळखले जाते, असे असतानाही हा प्रकार समोर आला आहे.

दोन एजन्सींमार्फत तपास सुरू
पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचा तपास सुरू केल्याचे इस्त्रायली पोलिसांनी मंगळवारी सांगितले. तसेच, पोलिसांनी सांगितले की, नफ्ताली बेनेट आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आणि त्यासोबत जिवंत काडतूसासह पाठवण्यात आले होते. याप्रकरणी विशेष गुन्हे विभाग आणि अंतर्गत सुरक्षा एजन्सी शिन बेट यांनी तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होऊन दोषी पकडले जातील. 

'राजकीय संघर्ष कितीही खोल असला तरी...'
दुसरीकडे, या घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या पत्रानंतर आता नफ्ताली बेनेट आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच, पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनीही या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "राजकीय संघर्ष कितीही खोल असला तरी कोणालाही हिंसाचार, खोटेपणा आणि मृत्यूच्या धमक्यांपर्यंत येण्याची गरज नाही. अर्थात मी एक पंतप्रधान आणि राजकारणी आहे, पण त्याच बरोबर मी एक पती आणि वडील देखील आहे. एक पती आणि वडील म्हणून माझ्या पत्नी आणि मुलांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे."

कोण आहेत नफ्ताली बेनेट?
नफ्ताली बेनेट हे कट्टर सनातनी ज्यू असून ते ज्यू पुनर्वसन चळवळीत तेल अविवमध्ये राहात होते. आपल्या राजकीय कारर्किदीत ते माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा उजवा हात समजले जात होते. पण नेतन्याहू यांच्या कार्यपद्धतीवर ते नाराज होते. त्यांनीच नेतन्याहू यांची 12 वर्षांची अनिर्बंध सत्ता बरखास्त व्हावी म्हणून मध्यम केंद्री व डाव्यांशी युती केली. नफ्ताली बेनेट यांची यामिना पार्टी ही मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत 120 जागांपैकी केवळ 7 जागांवर निवडून आली होती. पण त्यांनी नेतन्याहू यांच्यापुढे मान झुकवली नाही. या पक्षाने संसदेत नेतन्याहूंकडे कमी संख्याबळ असल्याचा फायदा घेत किंग मेकर होण्याची भूमिका बजावली आहे.  

Web Title: israeli prime minister naftali bennett family receive a letter containing death threat and a live bullet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.