इस्रायलच्या रणगाड्यांचा गाझाला वेढा; हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील; नेतन्याहू यांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 07:16 AM2023-10-11T07:16:19+5:302023-10-11T07:16:48+5:30

गाझात ३.६० लाख  सैन्य तैनात करण्यात आले असून, ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे. 

Israeli tanks encircle Gaza; This attack will be remembered for generations to come; Netanyahu took the oath | इस्रायलच्या रणगाड्यांचा गाझाला वेढा; हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील; नेतन्याहू यांनी घेतली शपथ

इस्रायलच्या रणगाड्यांचा गाझाला वेढा; हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील; नेतन्याहू यांनी घेतली शपथ

जेरुसलेम : इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून, इस्रायलच्यायुद्धविमानांनीयुद्धाच्या चौथ्या दिवशी मंगळवारीही हमासचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझा शहरावर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलने संपूर्ण गाझाची नाकेबंदी केली असून,  शहराला रणगाड्यांचा वेढा घालण्यात आला आहे. गाझात ३.६० लाख  सैन्य तैनात करण्यात आले असून, ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे. 

  हमासने केलेल्या हल्ल्याचा हा बदला असून, हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असा असेल, अशी शपथच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. संपूर्ण गाझा शहर बेचिराख झाले आहे. १,८७,०० नागरिकांनी गाझा शहर सोडले आहे. गाझाची संसद आणि मंत्रालये लक्ष्य केले जात आहे. 
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात १,६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांत प्रथमच इस्रायलच्या रस्त्यावर असा रक्तपात दिसत आहे. पूर्वसूचना न देता नागरिकांना लक्ष्य करून हल्ले केले तर इस्रायली ओलीस नागरिकांना ठार करण्यात येईल, असा इशारा हमासने दिल्याने तणाव आणखी वाढला आहे.

इस्रायलने गाझा शहर सर्व बाजूंनी वेढले असून, दिवसरात्र हवाई हल्ले सुरू आहेत. मरण पावलेल्या मांजरीकडे हताश नजरेने पाहताना चिमुकला.

नेतन्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्धाबाबतची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले की, भारत  दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
 

Web Title: Israeli tanks encircle Gaza; This attack will be remembered for generations to come; Netanyahu took the oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.