एका इशाराची वाट पाहतंय इस्त्रायलचं सैन्य! जोरदार हल्ला करणार, चारही बाजूंनी घेरण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 02:59 PM2023-10-15T14:59:41+5:302023-10-15T15:00:47+5:30
गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध नवव्या दिवसात अधिक विनाशकारी बनले आहे. इस्रायलचे सैन्य गाझा पट्टीवर भीषण हल्ले करत आहेत. यासाठी इस्रायली लष्कराने बॅरिकेड आणखी वाढवले आहेत. इस्रायलच्या या ग्राउंड ऑपरेशनबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायली संरक्षण दल मोठ्या ऑपरेशनसाठी तयार आहे, पण अमेरिका अजूनही या ऑपरेशनबद्दल संकोच करत आहेत.
इस्रायल सर्वात मोठा हल्ला करणार; नागरिकांना 3 तासांत गाझा सोडण्याचे आदेश
अमेरिकेकडून ग्रीन सिग्नल मिळण्यास उशीर झाल्यामुळे इस्रायलचे ग्राउंड ऑपरेशन सुरू केले जात नसल्याचे उच्च संरक्षण सूत्राने म्हटले आहे. गाझा पट्टी रिकामी होईपर्यंत अमेरिका तयार नाही. या युद्धात ९ दिवसांत दोन्ही बाजूंचे ३६०० हून अधिक लोक मरण पावले आहेत, तर १२ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायल गाझावर सर्वाधिक हल्ले करत आहे. आता इस्त्रायली सैन्य हमासच्या बोगद्यांना लक्ष्य करत आहे.
गाझामध्ये इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात दोन दिवसांत तीन हमास कमांडर ठार झाले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व करणारा हमासचा आणखी एक कमांडर अल-कदर देखील मारला गेला आहे. दुसरीकडे, लेबनॉनने इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे. लेबनॉनने श्तुला भागात मोर्टार आणि अँटी-टँक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, ज्यात ३ सैनिकांसह ५ इस्रायली जखमी झाले आहेत. सध्या पश्चिम किनाऱ्यावर आमने-सामने लढत सुरू आहे.
निर्वासित कॅम्पमधून ५५ हमास सैनिकांना अटक
आज गाझामधील लोकांना पुन्हा तीन तासांचा अवधी देण्यात आला आहे. लोकांना भारतीय वेळेनुसार १२.३० ते ३.३० पर्यंत उत्तर गाझा सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गाझावर हल्ले करण्यासोबतच इस्रायली फौजाही जमिनीवर हल्ले करत आहेत. इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील वेगवेगळ्या निर्वासित शिबिरांमधून सुमारे ५५ हमास सैनिकांना अटक केली आहे. पश्चिम किनार्यावरील दाएशच्या तळावर छापा टाकून ३ लढवय्यांना अटक केली. पश्चिम किनाऱ्यातील अमरी शरणार्थी शिबिरातूनही मोठ्या संख्येने लढवय्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.