इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:14 AM2024-10-04T09:14:59+5:302024-10-04T09:17:41+5:30
इस्त्रायलने हिजबुल्लाह विरोधात आणखी एक कारवाई केली आहे. हिजबुल्लाहच्या नव्या चीफला इस्त्रायलने केले लक्ष्य.
काही दिवसापूर्वी इस्त्रायने मोठी कारवाई करत हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरुल्लाह यांची हत्या केली. यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला. आता इस्त्रायलने आणखी कारवाया वाढवल्या आहेत, आता हिजबुल्लाहचा नवा चिफ हाशिम सफीद्दीन इस्त्रायलच्या टारगेटवर आहे. काल त्याला लक्ष्य करत हल्ला केला. लेबनीजच्या अहवालाचा हवाला देऊन, इस्रायली माध्यमांनी दावा केला आहे की IDF ने बेरूतच्या दाहेह उपनगरात हाशेम सफीद्दीनला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायलचा हल्ला या आधीच्या हल्ल्यांपेक्षा मोठा होता.
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने गुरुवारी मध्यरात्री बेरूतवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. त्यावेळी सफीद्दीन भूमिगत बंकरमध्ये हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक करत होते, असे सांगण्यात येत आहे. इस्रायलने नसराल्लाहला ठार मारल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक बॉम्बस्फोट होता. इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, की स्ट्राइकमध्ये सफीद्दीनसह प्रमुख हिजबुल्ला नेत्यांच्या बैठकीला लक्ष्य करण्यात आले. इस्त्रायली संरक्षण दल किंवा लेबनॉनमधील हिजबुल्लाकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
आयडीएफने बेरूतसह दक्षिणी लेबनॉनमधील भागांवर हल्ला केला. बेरूतमध्ये अनेक मोठे स्फोट झाले, यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हाशिम सफीद्दीनला २०१७ मध्ये अमेरिकेने दहशतवादी घोषित केले होते. ते सध्या हिजबुल्लाच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून दहशतवादी संघटनेच्या जिहाद परिषदेचा सदस्यही आहे. नसराल्लाह आणि नईम कासिम यांच्यासह हिजबुल्लाच्या प्रमुख तीन नेत्यांमध्ये सफीद्दीन यांची गणना होते. हाशिम सफीद्दीन इस्रायलच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. संघटनेच्या लष्करी कारवायांची आखणी करणाऱ्या जिहाद कौन्सिलचे ते अध्यक्ष आहेत.
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले
इस्रायल एकीकडे लेबनॉन आणि इराणशी संघर्ष करत आहे, तर दुसरीकडे गाझावरही त्याचे सातत्याने हल्ले सुरू आहेत. दरम्यान, आता इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) गुरुवारी पॅलेस्टिनी संघटना हमासच्या तीन सर्वोच्च नेत्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा सरकारचा प्रमुख रावी मुश्ताहा याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, हमास कमांडर समेह सिराज आणि समेह औदेह हेदेखील मारले गेले आहेत.
या कारवाईची माहिती देताना IDF ने सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी हवाई हल्ले केले होते, ज्यात हमासचे तीन वरिष्ठ नेते रावी मुश्ताहासह समेह सिराज आणि समेह औदेह ठार झाले. तिघेही उत्तर गाझामधील भूमीगत बंकरध्ये लपले होते. या जागेचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून केला जायचा. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईबाबत इस्रायलने आता खुलासा केला आहे.