ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला! ७० जणांचा मृत्यू , मदतीसाठी आरडा-ओरड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:25 AM2023-12-25T10:25:40+5:302023-12-25T10:26:13+5:30

इस्रायलने ख्रिसमसच्या दिवशी गाझावर मोठा हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Israel's big air attack on Gaza on Christmas day 70 people died | ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला! ७० जणांचा मृत्यू , मदतीसाठी आरडा-ओरड

ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला! ७० जणांचा मृत्यू , मदतीसाठी आरडा-ओरड

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. अजुनही हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. आज एकीकडे जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे इस्रायलने गाझावर मोठा हवाई हल्ला केला असून या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इस्रायलने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून सोमवारी सकाळपर्यंत गाझावर बॉम्बफेक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, गाझामध्ये ७० लोकांच्या मृत्यूनंतर परिस्थिती खूपच वाईट आहे. अनेकजण बचावासाठी धावत असल्याचे दिसत आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने इस्रायलच्या या हल्ल्याचे वर्णन ‘नरसंहार’ असे केले आहे. अल-मगाझी निर्वासित कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला आहे.

इस्रायली हल्ल्याबाबत फ्रीडम थिएटरने सांगितले की, व्याप्त वेस्ट बँकमधील जेनिन निर्वासित शिबिरावर इस्रायली हल्ला झाला आहे. "ख्रिसमसच्या दिवसाची सुरुवात जेनिन निर्वासित शिबिरावर आणखी एका हल्ल्याने होते," जेनिन-आधारित थिएटर कंपनीने X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये लिहिले. फ्रीडम थिएटरचे निर्माते मुस्तफा शेटा यांना 13 डिसेंबर रोजी इस्रायली सैन्याने अटक केली होती. तेव्हापासून तो कोठडीत आहे.

या संपूर्ण घटनेवर इस्रायली लष्कराने एक निवेदनही जारी केले आहे. या घटनेचा आढावा घेत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. लष्कराचे म्हणणे आहे की त्यांना हमासला लक्ष्य करायचे आहे, नागरिकांना नाही.

७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर पहिला हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलने हमालविरुद्ध युद्ध सुरू केले. हमासच्या हल्ल्यात १२०० हून अधिक लोक मारले गेले. एवढेच नाही तर यानंतर हमासने २४० लोकांना ओलीस ठेवले असले तरी यापैकी १४० इस्रायली नागरिकांना युद्धबंदीच्या अटीवर सोडण्यात आले.

अफगाणिस्तानने भारताकडे धरण बांधण्यासाठी मदत मागितली, पाकिस्तानची युद्धाची धमकी 

दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यातही हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत २०,४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Israel's big air attack on Gaza on Christmas day 70 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.