इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 04:04 PM2024-09-29T16:04:47+5:302024-09-29T16:05:43+5:30

लेबनॉनने रविवारी देशात 5 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे...

Israel's heavy attacks on Hezbollah, after Nasrallah, now Nabil Kouk is eliminated | इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

 
नसरल्लाहनंतर आता हिजबुल्लाह कमांडर नबील कौकचा खात्मा केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. मात्र अद्याप हिजबुल्लाहने कौकच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. पण, कौकचे समर्थक शनिवारपासूनच शोक संदेश पोस्ट करत आहेत. यासंदर्भात रायटर्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे. नबीलवरील हा हल्ला इस्रायलने हसन नसरल्लाहच्या खात्म्यानंतर शनिवारी केला. नबील कौक हिजबुल्लाहच्या केंद्रीय परिषदेचा उप प्रमुख होता. 

इस्रायलनं कसा केला नबील कौकचा खात्मा...? -
इस्रायली लष्कराने जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिजबुल्लाच्या प्रतिबंधात्मक सुरक्षा युनिटचा कमांडर आणि केंद्रीय परिषदेचा सदस्य असलेल्या कौकला इस्रायली लढावू विमानांनी लष्करी गुप्तचरांच्या अचूक माहितीनुसार लक्ष्य केले आणि त्याचा खात्मा केला.

इस्रायली लष्कराने दिलेल्या महितीनुसार, त्यांनी यावर्षात हिजबुल्लाहच्या नऊ सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडरपैकी आठ जणांचा खात्मा केला आहे. ज्यात नसराल्लाहचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, यांपैकी अदिकांश गेल्या आठवड्यातच मारले गेले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या कमांडर्सनी रॉकेट विभागापासून ते एलिट रडवान फोर्सपर्यंतच्या तुकड्यांचे नेतृत्व केले होते.

लेबनॉनमध्ये 5 दिवसांचा दुखवटा -
लेबनॉनने रविवारी देशात 5 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. यामुले देशातील सर्व दुकाने, व्यवसाय आणि सरकारी कार्यालये बुधवारपर्यंत बंद राहणार आहेत. आता हाशेम सफीद्दीन इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा प्रमुख म्हणून हसन नसरल्लाहची जागा घेईल. सफीद्दीन हा नसरल्लाहचा चुलत भाऊ आहे.

Web Title: Israel's heavy attacks on Hezbollah, after Nasrallah, now Nabil Kouk is eliminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.