Chandrayaan - 2 चा इस्रोशी संपर्क तुटला अन् आनंदात रसगुल्ला खाणं ठरलं जीवघेणं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 07:30 PM2019-09-09T19:30:26+5:302019-09-09T19:32:42+5:30
रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांना रसगुल्ला खाऊन आनंद साजरा करण्याची इच्छा झाली.
बांग्लादेश - इस्रोच्या चांद्रयान-२ सोबत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने भारताचे शत्रू असलेले देश म्हणजे पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये आनंद साजरा केला जात आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास चांद्रयान - २ चा इस्रोशी संपर्क तुटल्याने बांग्लादेशमध्ये फटाके फोडून आणि एकमेकांना गोडधोड भरवून बांग्लादेशींनी आनंद साजरा करत असतानाच एका बांग्लादेशी नागरिकाचा आनंद लूटत असताना रसगुल्ला खाताना मृत्यू झाला आहे. रेझाऊल शेख करीम असे मृत बांग्लादेशीचे नाव आहे.
न्यूज 18 असम या वृतसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार इस्रोच्या चांद्रयान-२ सोबत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने पाकिस्तान आणि बांग्लादेशी नागरिकांनी आनंद साजरा केला. यावेळी फटाके फोडून काहीजणांनी आनंद साजरा केला. दरम्यान, बांग्लादेशमध्ये नोआखाली परिसरात राहणारा रेझाऊल मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यानंतर रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांना रसगुल्ला खाऊन आनंद साजरा करण्याची इच्छा झाली. त्यानंतर रेझाऊल मित्रांसोबत दुकानात गेला. दुकानात गरमागरम रसगुल्ला खाताना एक रसगुल्ला रेझाऊलच्या घशात अडकला आणि त्याचा श्वास कोंडला गेला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्याचप्रमाणे songbadsomachar.com या बांग्लादेशी न्यूजवेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार गरम गरम रसगुल्ला खाता असताना हसत असताना अचानक रेझाऊल चक्कर येऊन खाली पडला. दुकानदार आणि त्याच्या मित्रांना कळेपर्यंत रेझाऊल बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर जिल्हास्तरावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा तेथे मृत्यू झाला.