कॅमरून यांच्याकडून वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी
By admin | Published: April 11, 2016 02:24 AM2016-04-11T02:24:45+5:302016-04-11T02:24:45+5:30
पनामा पेपर्स लीक प्रकरणात आपल्या पित्याचे नाव आल्यानंतर राजीनामा देण्यासाठी दबावाखाली आलेले ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी आपली वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी केली.
लंडन : पनामा पेपर्स लीक प्रकरणात आपल्या पित्याचे नाव आल्यानंतर राजीनामा देण्यासाठी दबावाखाली आलेले ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी आपली वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी केली.
याशिवाय या प्रकरणामुळे निर्माण झालेले वादंग शांत करण्याच्या दृष्टीने त्यांनी तपासासाठी नवीन टास्क फोर्स गठित केला आहे. स्वत:चे प्राप्तीकर विवरणपत्र जारी करण्याची कॅमरून यांची ही कृती अभूतपूर्व मानली जात आहे.
त्यांनी जारी केलेल्या विवरणपत्रानुसार कॅमरून यांनी २०१४-१५ या वित्तीय वर्षात २००३०७ पाऊंड उत्पन्नावर ७५८९८ पाऊंड कर अदा केला आहे.
पनामा पेपर्स प्रकरणात कॅमरून यांच्या वडिलांचे नाव आल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाशी निगडित करासंबंधी बाबी अधिक चांगल्या रीतीने हाताळू शकलो असतो, असे स्पष्ट केले होते. झालेल्या प्रकाराबद्दल आपल्यालाच जबाबदार ठरविले पाहिजे. हा आपल्याला मिळालेला एक धडा आहे, असे त्यांनी शनिवारी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी रविवारी आपली वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी केली.