दहशतवादाच्या मुद्दावर भारताने अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांना सुनावले
By admin | Published: June 22, 2017 06:06 PM2017-06-22T18:06:20+5:302017-06-22T18:07:24+5:30
दहशतवादाच्या मुद्यावर भारताने आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या घटक राष्ट्रांनी अफगाणिस्तानमध्ये
Next
>ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्रे, दि. 22 - दहशतवादाच्या मुद्यावर भारताने आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या घटक राष्ट्रांनी अफगाणिस्तानमध्ये सरकारविरोधी घटकांना सामुहिक लष्करासोबत लढण्यासाठी हत्यारे, प्रशिक्षण आणि अर्थपुरवठा करणाऱ्या स्रोतांचा शोध घ्यावा, असा सल्ला भारताने पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख न करता दिला. या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे आश्रयदाते आणि दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा यावर लगाम लावण्यात अपयशी ठरलेली संयुक्त राष्ट्रे आणि अमेरिकेसह जागतिक समुदायावर निशाणा साधला आहे.
संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी प्रतिनिदी सय्यद अकबरुद्दीन बुधवारी म्हणाले, "अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांकडे दैनंदिन घटनेसारखे पाहिले जात आहे. दहशतवादी आणि गुन्हेगारी समुहांच्या हिंसक कृत्यांकडे सरकार विरोधी घटक किंवा यादवी आणि राजकीय संघर्ष म्हणून पाहत दूर्लक्ष केले जात आहे. असे करून आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे आणण्यात अपयशी ठरत आहोत."
अफगाणिस्तानबाबत सुरक्षा परिषदेमध्ये झालेल्या एका बैठकीला संबोधित करताना अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचे नाव न घेता टीका केली. " अफगाणिस्तानमधील विद्रोही घटक हत्यारे, स्फोटके, प्रशिक्षण आणि अर्थपुरवठा कुठून मिळवत आहेत. त्यांना सुरक्षित आश्रय कुठे मिळतो. जगातील सर्वात मोठ्या सैन्य शक्तीविरोधात उभे राहणे त्यांना शक्य कसे काय होते. तालिबान, हक्कानी नेटवर्क, अल कायदा. दाएश, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि त्यांचे अन्य समूह सुद्धा दहशतवादी संघटना आहेत. त्यातील अनेक संघटनांवर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. या सर्व संघटनांना दहशतवादी संघटना मानले गेले पाहिजे. तसेच त्यांच्या कृत्यांना कोणत्याही प्रकारे योग्य ठरवण्यात येऊ नये."