इस्तंबुल विमानतळ स्फोटांनी हादरले, 36 जणांचा मृत्यू, 147हून अधिक जखमी
By Admin | Published: June 29, 2016 03:57 AM2016-06-29T03:57:26+5:302016-06-29T09:11:11+5:30
टर्कीचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दोन स्फोटांनी हादरले.
ऑनलाइन लोकमत
इस्तंबुल, दि. 29 - टर्कीचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दोन स्फोटांनी हादरले. या भीषण स्फोटात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 147 हून अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच इसिसनं केल्याची शक्यता तुर्कीनं व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा 50 पर्यंत वाढण्याची भीती तुर्की सरकारच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे, असं वृत्त द गार्डियन या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
इस्तंबुल विमानतळावरून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. द गार्डियनच्या माहितीनुसार एके 47 असलेल्या काही अज्ञात बंदुकधारी दहशतवाद्यांनी इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या बंदुकधारी दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला. अचानक झालेल्या या दोन स्फोटानंतर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक जण आपला जीव वाचविण्यासाठी जमिनीवर झोपले तर काहींनी इमारतीमध्ये धाव घेतली. या वर्षातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते.
Istanbul airport attack: Turkish PM says Isis behind explosions that killed at least 36 – latest updates https://t.co/CW8mxegYF4
— The Guardian (@guardian) June 29, 2016