इस्नयलचा पुन्हा हल्ला; मृतांची संख्या 1655
By admin | Published: August 3, 2014 02:08 AM2014-08-03T02:08:45+5:302014-08-03T02:08:45+5:30
हमासने आपल्या एका सैनिकाचे कथित अपहरण केल्याच्या पाश्र्वभूमीवर इस्नयलने शनिवारी गाझापट्टीच्या दक्षिण भागावर नव्याने हल्ले सुरू केले आहेत.
Next
गाझा/जेरुसलेम : हमासने आपल्या एका सैनिकाचे कथित अपहरण केल्याच्या पाश्र्वभूमीवर इस्नयलने शनिवारी गाझापट्टीच्या दक्षिण भागावर नव्याने हल्ले सुरू केले आहेत. इस्त्रयली हल्ल्यात आतार्पयत 1655 पॅलेस्टिनी मारले गेले.
गाझातील आरोग्य अधिका:यांनी सांगितले की, रविवारी रात्री इस्नयलने राफा भागाला लक्ष्य केले. यात कमीत कमी 5क् जण मारले गेले. इस्नयली हल्ल्यात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या आता 165क् र्पयत गेली असून 8,9क्क् पॅलेस्टिनी जखमी झाले.
हमासप्रशासित गाझापट्टीवर इस्नयलने केलेल्या भीषण गोळीबारात 16क् पॅलेस्टिनी ठार झाले. या संघर्षात आतार्पयत 63 इस्नयली सैनिकांना मारले गेले, तर 4क्क् हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये भारतीय वंशाच्या एका इस्त्रयली सैनिकासह तीन नागरिकांचा समावेश आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघटना आणि अमेरिका यांच्या मध्यस्थीने शुक्रवारी 72 तासांची शस्त्रसंधी औटघटकेची ठरली. शस्त्रसंधी अमलात आल्यानंतर दोन तासांत इस्नयलने हल्ले सुरू केले. आपल्या दोन सैनिकांची हत्या आणि एकास ओलीस ठेवून हमासने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्नयलने केला आहे. दुसरीकडे, हमासने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यास नकार दिला आहे.
तिकडे, इस्नयलकडून आज अनेक रॉकेट हल्ले करण्यात आले. इस्नयली सैन्य दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवारी 51 रॉकेट आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला.
दरम्यान, हमासने इस्नयली सैनिकांची हत्या आणि अपहरण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. (वृत्तसंस्था)