...या दोन व्यक्तींना फेसबुकवर ब्लॉक करणं अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 08:10 PM2017-09-04T20:10:52+5:302017-09-04T20:17:01+5:30

युजर्सला फेसबुकवर ब्लॉक करणं ही काही अवघड गोष्ट नाही. पण असं असलं तरी कोणताही फेसबुक युजर या दोन व्यक्तींना ब्लॉक करू शकत नाही.

... it is impossible to block these two people on Facebook | ...या दोन व्यक्तींना फेसबुकवर ब्लॉक करणं अशक्य

...या दोन व्यक्तींना फेसबुकवर ब्लॉक करणं अशक्य

googlenewsNext

नवी दिल्ली, दि. 4 - युजर्सला फेसबुकवर ब्लॉक करणं ही काही अवघड गोष्ट नाही. पण असं असलं तरी कोणताही फेसबुक युजर या दोन व्यक्तींना ब्लॉक करू शकत नाही. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांना फेसबुकवर ब्लॉक करता येत नाही. तुम्ही विचार कराल की फेसबुकचा मालकच तो, केलं असेल काहीतरी टेक्निक. पण त्यांना का ब्लॉक करता येत नाही, याचं कारण वेगळंच आहे.

मार्क किंवा प्रिसिलाच्या प्रोफाइलवर जाऊन तुम्ही ब्लॉकचा पर्याय निवडला तर स्क्रीनवर ब्लॉक एरर असं लिहिलेला एक मोठा बोर्ड दिसतो. हे खरंतर का होतं ठाऊक आहे? मार्क आणि प्रिसिलाला इतक्यांदा ब्लॉक केलं गेलंय की वेबसाइटला हे फंक्शनच बंद करावं लागलं.

मार्क स्वत: फेसबुकवर सक्रिय असतो. अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींवर तो आपलं मत मांडतो. फेसबुकच्या अल्गोरिदमच्या मदतीनं या पोस्टस् पुन्हा लोकांच्या न्यूज फीडमध्ये जातात. ज्या लोकांना या पोस्टस् वाचायच्या नसतात ते त्या ब्लॉक करत होते. हे इतक्यांदा झालं की साइटने त्यांच्या प्रोफाइलवर ब्लॉकिंगलाच बॅन करण्याचं ठरवलं. ही बंदी सुमारे २०१० पासून आहे.

फेसबुकमधल्याच तांत्रिक अडचणींमुळे ब्लॉक एरर हा मेसेज येत असल्याचा खुलासा फेसबुकच्या प्रवक्त्यानं केला असल्याचं द गार्डियन वृत्तपत्रानं म्हटलं आहे. कमी वेळात एखादी प्रोफाईल जास्तीत जास्त लोकांनी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला की हा एरर येतो, असं त्यानं सांगितलं. मार्क आणि प्रिसिला यांना लाखो युजर्सनं एकाचवेळी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला असल्यानं ती प्रोफाईल आता ब्लॉक करणं अशक्य असल्याचं कारण त्यानं सांगितलं. फक्त मार्क किंवा प्रिसिलाच नाही तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रोफाईलला हा एरर येत असल्याचा खुलासाही त्यानं केला आहे. या एररवर फेसबुक काम करत असून, लवकरच यातून तोडगा निघेल, पण तूर्तास तरी कोणताही युजर या दोघांनाही फेसबुकवर ब्लॉक करू शकत नाही.

Web Title: ... it is impossible to block these two people on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.