‘स्वीटी’, ‘हनी’ संबोधणे अयोग्यच

By Admin | Published: April 10, 2016 03:05 AM2016-04-10T03:05:31+5:302016-04-10T03:05:31+5:30

कार्यक्षेत्र किंवा समाजात महिला बरोबरीचा दर्जा मिळविण्याच्या हकदार आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे त्यांना ‘स्वीटी’ किंवा ‘हनी’ असे संबोधणे योग्य नाही, असे पेप्सिकोच्या मुख्य

It is inappropriate to call 'sweetie', 'honey' | ‘स्वीटी’, ‘हनी’ संबोधणे अयोग्यच

‘स्वीटी’, ‘हनी’ संबोधणे अयोग्यच

googlenewsNext

न्यूयॉर्क : कार्यक्षेत्र किंवा समाजात महिला बरोबरीचा दर्जा मिळविण्याच्या हकदार आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे त्यांना ‘स्वीटी’ किंवा ‘हनी’ असे संबोधणे योग्य नाही, असे पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी म्हटले आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या सहकार्याने आयोजित ‘वूमेन इन द वर्ल्ड’ या विषयावरील शिखर परिषदेत बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले. पत्रकार आणि लेखिका टीना ब्राऊन यांच्या उपस्थितीत नूयी म्हणाल्या की, आम्हाला अजूनही बरोबरीचा दर्जा मिळणे बाकी आहे. महिलांना ‘स्वीटी’ किंवा ‘हनी’ असे संबोधणे मला पसंत नाही. मलासुद्धा लोक बऱ्याचवेळा या नावाने संबोधित करतात. स्वीटी, हनी असे संबोधण्यापेक्षा लोकांनी आमच्याशी एक कार्यकारी आणि सामान्य नागरिक म्हणून वर्तणूक ठेवली पाहिजे. यात बदल झाला पाहिजे.
नूयी म्हणाल्या की, आपल्या समान वेतनाच्या मागणीसाठी ‘मुलांच्या जमातीत’ सामील होण्यासाठी अनेक वर्षांपासून महिला ‘क्रांती’ करण्याच्या तयारीत आहेत. महिलांनी आपली पदवी, शाळेतील चांगला दर्जा यामुळे कार्यक्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे समकक्ष पुरुषांनी आम्हाला गांभीर्याने घेतले आहे.
या कार्यक्षेत्रात आम्ही क्रांतिकारी रूपात आपला रस्ता तयार केला आहे. आता आम्हाला वेतनात बरोबरीची गरज आहे. त्यासाठी आम्ही आतापर्यंत लढाई लढत आहोत. महिलांसोबत असलेल्या वर्तणुकीवर खेद व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, कार्यक्षेत्रातसुद्धा महिला दुसऱ्या महिलांना मदत करीत नाहीत. खरे तर त्यांना त्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. महिलांचे आपसातील सहकार्य आणखी मजबूत झाले पाहिजे. दुसऱ्या महिलांकडून मिळालेली माहिती महिला सकारात्मक दृष्टीने घेत नाहीत, पण तीच माहिती त्यांना पुरुषांकडून मिळाल्यास त्या त्याचा लगोलग स्वीकार करतात.
नूयी म्हणाल्या की, आपला व्यवसाय आणि कौटुंबिक जीवन यात सामंजस्य ठेवणे सोपे नव्हते.

५२ आठवड्यांपर्यंत रजा पुरेशी नाही
जीवनात मागे वळून पाहिल्यास कोणत्या गोष्टीचा खेद होतो, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, करिअरला पुढे नेताना मला कोणताही पश्चात्ताप झाला नाही; पण मी माझ्या मुलींना योग्य तेव्हा वेळ देऊ शकले नाही याचे मला दु:ख वाटते. मातृत्व आणि पितृत्व रजा ५२ आठवड्यांपर्यंत वाढविणे पुरेसे नाही. मुलाला घरी सोडून कामावर जाणे सोपे नाही.

Web Title: It is inappropriate to call 'sweetie', 'honey'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.