रात्रीच्या वेळी अवकाशातून अशी दिसते भारत - पाक सीमा

By admin | Published: October 6, 2015 02:03 PM2015-10-06T14:03:44+5:302015-10-06T14:13:38+5:30

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातून विस्तव जात नाही, परंतु त्यांच्यामधली सीमारेषा मात्र रात्रीच्या वेळी अत्यंत झगमगीत दिसते

It looks like the Indo-Pak border at night | रात्रीच्या वेळी अवकाशातून अशी दिसते भारत - पाक सीमा

रात्रीच्या वेळी अवकाशातून अशी दिसते भारत - पाक सीमा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारत आणि पाकिस्तान या दोन देशातून विस्तव जात नाही, परंतु त्यांच्यामधली सीमारेषा मात्र रात्रीच्या वेळी अत्यंत झगमगीत दिसते. हे दृष्य उपलब्ध झालंय नासामुळे. नासाने भारत व पाकिस्तान अवकाशातून कसे दिसतात याचा काढलेला फोटो आपल्या फेसबुक पेजवर टाकलाय. विशेष म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर असलेल्या एका अंतराळवीराने सप्टेंबर २३ रोजी निकॉन D4 या डिजिटल कॅमे-याने २८ mm ची लेन्स वापरून हा फोटो काढलाय. आंतरराष्ट्रीय सीमारेषा या मोजक्याच देशांच्या बाबतीत रात्रीच्या वेळी इतक्या स्पष्ट दिसतात, त्यातील भारत पाक सीमारेषा आहे. भारत व पाक यांच्यातील सीमारेषा सुरक्षा दलांच्या विशिष्ट अशा ऑरेंज रंगाच्या दिव्यांच्या झगमगाटामुळे उठून दिसते.

Web Title: It looks like the Indo-Pak border at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.