ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अमेरिकेत कुटुंब असणं गरजेचं असतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 10:00 AM2019-01-05T10:00:00+5:302019-01-05T10:00:02+5:30
प्रश्न- एखाद्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळवायचं असल्यास त्याचं कुटुंब अमेरिकेत असायला हवं, असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का?
प्रश्न- एखाद्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळवायचं असल्यास त्याचं कुटुंब अमेरिकेत असायला हवं, असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का?
उत्तर- नाही. इमिग्रंट विसासाठी पात्र ठरणारे बहुतांश जण त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळाल्यावर किंवा त्यांचं कुटुंब अमेरिकेत वास्तव्यात असल्यावर ग्रीन कार्डसाठी अर्ज करतात. मात्र यासाठी इतर इमिग्रंट विसा गटदेखील उपलब्ध आहेत.
उदाहरणार्थ, रोजगारावर आधारित काही इमिग्रंट विसा गटातील व्यक्तींना थेट ग्रीन कार्डसाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी अमेरिकेचं नागरिक असणं किंवा कुटुंबातील कोणी अमेरिकेचं नागरिक असणं गरजेचं नसतं. विशिष्ट इमिग्रंट गटातील विसाधारकांना अमेरिकेत पोहोचल्यावर तिथलं कायमस्वरुपी नागरिकत्व मिळू शकतं. प्रत्येक आर्थिक वर्षात (1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर) साधारणपणे 1,40,000 कर्मचाऱ्यांना विशिष्ट इमिग्रंट गटाचा विसा दिला जातो. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यांतर्गत हा विसा देण्यात येतो.
रोजगारावर आधारित इमिग्रंट विसामध्ये विविध प्रकारच्या व्यायसायिक क्षेत्रांचा समावेश होतो. विज्ञान, कला, शिक्षण, व्यवसाय या क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्यांसाठी काही विशिष्ट विसा प्रकारचे विसा दिले जातात. याशिवाय कुशल कामगारांनाही इमिग्रंट विसा दिला जातो. ज्या क्षेत्रात काम करणारे कुशल कामगार अमेरिकेत नाहीत, त्या क्षेत्रातील कामगारांना विशेष प्राधान्य मिळतं. रोजगारावर आधारित इमिग्रंट विसासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती www.uscis.gov/greencard या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इमिग्रंट विसासाठी अर्ज करणारे अनेकदा ग्रीन कार्ड लॉटरीबद्दल विचारणा करतात. ही प्रक्रिया 'डायवर्सिटी विसा प्रोग्राम' म्हणून ओळखली जाते. या लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तीला काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव लक्षात घेतला जातो. यासाठी किमान सेकण्डरी स्कूल डिप्लोमा आवश्यक असतो. मात्र या प्रक्रियेसाठी विशिष्ट देशांमधील व्यक्तींचाच विचार केला जातो. ज्या देशातून अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, त्यांचे अर्ज या प्रक्रियेत विचारात घेतले जातात. (मागील 5 वर्षात ज्या देशातील 50 हजारहून कमी व्यक्ती अमेरिकेत स्थलांतरित झाल्या आहेत, त्या देशांमधील नागरिकांचा या प्रक्रियेसाठी विचार केला जातो.) सध्या भारत डायवर्सिटी विसा प्रोग्रामसाठी पात्र नाही.
कुटुंबाशिवाय जाणाऱ्यांना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळवण्यासाठी वरील गटांसोबतच आणखीही काही पर्याय उपलब्ध आहेत. याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी यूएस मिशनच्या इमिग्रंट विसा पेजला (in.usembassy.gov/visas/immigrant-visas/) भेट द्या.