Sting Operation: अ‍ॅक्ट्रेसशी शरीर संबंध ठेवून कॅन्सरचे विषाणू मारण्याचा केला दावा; इटलीचा डॉक्टर स्टिंगमध्ये अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 03:01 PM2021-11-26T15:01:49+5:302021-11-26T15:03:35+5:30

Sting Operation of Italian gynecologist: या डॉक्टरविरोधात अन्य पीडित महिलांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या डॉक्टरला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे. 

Italian gynecologist allegedly offered to have sex with woman to 'cure' virus cancer | Sting Operation: अ‍ॅक्ट्रेसशी शरीर संबंध ठेवून कॅन्सरचे विषाणू मारण्याचा केला दावा; इटलीचा डॉक्टर स्टिंगमध्ये अडकला

Sting Operation: अ‍ॅक्ट्रेसशी शरीर संबंध ठेवून कॅन्सरचे विषाणू मारण्याचा केला दावा; इटलीचा डॉक्टर स्टिंगमध्ये अडकला

Next

इटलीतील एका प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरने शरीर संबंधांद्वारे कॅन्सर बरा करण्याचा दावा केला होता. यानंतर तो कथित महिला रुग्णासोबत हॉटेलच्या एका खोलीतही पोहोचला. मात्र रंगेहाथ पकडल्यानंतर या डॉक्टरने नोकरीचा राजीनामा दिला आहे. आता त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली आहे.

डॉक्टरची हे प्रताप तेव्हा समोर आले जेव्हा एका 33 वर्षीय महिला रुग्नाने एका टीव्ही चॅनलशी संपर्क साधला. या डॉक्टरने शरीर संबंध ठेवून रोग बरा करण्याची ऑफर दिली होती, असे सांगितले. यामुळे चॅनलने स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि एका अॅक्ट्रेसला हायर करून तिला डमी रुग्ण म्हणून त्या डॉक्टरकडे पाठविले. 

डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार 60 वर्षीय डॉक्टरचे नाव जियोवानी मिनिएलो (Dr. Giovanni Miniello) आहे. त्या चॅनलद्वारे पाठविण्यात आलेल्या अॅक्ट्रेसला त्यांनी human papillomavirus (HPV) असल्याचे निदान केले. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे, अशी भीती तिला घातली. तसेच लस घेतलेली असल्याने कॅन्सर होऊ नये म्हणून आपल्यासोबत शरीर संबंध ठेव, त्या व्हायरसविरोधात इम्यूनिटी देऊ शकतो, असे त्याने सांगितले. 

डॉक्टरला स्टिंग ऑपरेशन होत असल्याचे त्याला माहिती नव्हते. त्या डॉक्टरने अॅक्ट्रेसला हॉटेलमध्ये नेले. त्या हॉटेलच्या रुममध्ये छुपे कॅमेरे लावलेले होते.  डॉक्टरने त्याचे कपडे काढले. तेवढ्यात तेथे चॅनेलचे पत्रकार पोहोचले आणि त्याचे भांडे फुटले. यावर डॉक्टरने हे मी अभ्यासासाठी करत असल्याचे सांगितले. मी अनेक महिलांना कॅन्सरपासून वाचविले आहे. मात्र, त्याला जेव्हा तो स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकला असल्याचे समजले तेव्हा त्याला धक्का बसला. 

ज्या महिलेने चॅनलकडे तक्रार केली होती, तिला प्रेग्नन्सीमध्ये समस्या येत होती. यासाठी तिने डॉ. मिनिएलोशी संपर्क साधला होता. उपचारावेळी त्याने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. मात्र, त्याने उपचाराच्या नावाखाली शरीर संबंध बनविण्यासाठी दबाव टाकला तेव्हा तिला धक्का बसला होता. शेवटी तिने टीव्ही चॅनलची मदत घेत त्याचा बुरखा फाडला. आता या डॉक्टरविरोधात अन्य पीडित महिलांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या डॉक्टरला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे. 

Web Title: Italian gynecologist allegedly offered to have sex with woman to 'cure' virus cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.