इटलीमध्ये मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 03:56 PM2022-07-21T15:56:59+5:302022-07-21T15:58:03+5:30

Mario Draghi resigns : इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनामा दिला आहे.

Italian Prime Minister Mario Draghi resigns as coalition collapses | इटलीमध्ये मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा

इटलीमध्ये मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा

googlenewsNext

रोम : एकीकडे भारतामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा भूकंप पाहायला मिळाला. शिवसेना आणि अपक्ष अशा ५० आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर राज्यातील राजकीय भूकंपाचे वारे परदेशातही वाहताना दिसून येत आहेत. 

ब्रिटनमध्ये (Britain) सत्ताबदल पाहायला मिळत असताना आता इटलीमध्येही मोठा राजकीय भूकंप आला आहे. इटलीचे (Italy) पंतप्रधान मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनामा दिला आहे. सत्तेत असणाऱ्या युतीमधील पक्षांनी विश्वासदर्शक ठरावात भाग न घेतल्याने पंतप्रधान मारियो द्राघी यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार कोसळले. यानंतर पंतप्रधान मारियो द्राघी यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे देशात लवकर निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, महत्त्वाच्यावेळी इटली आणि युरोपसाठी अनिश्चिततेचा नवा काळ सुरू झाला आहे.

मारियो द्राघी यांनी क्विरिनाले पॅलेसमधील सकाळी झालेल्या एका बैठकीवेळी राष्ट्रपती सर्गिओ मॅत्तरेला यांच्याकडे आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा  सुपूर्द केला. सर्गिओ मॅत्तरेला यांच्या कार्यालयाने सांगितले की, राष्ट्रपतींनी मारियो द्राघी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच, मारियो द्राघी यांना सध्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, मारियो द्राघी यांच्या युतीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला फाईव्ह स्टार मुव्हमेंट (M5S) पक्षाने विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकल्याने मारियो द्राघी यांचे सरकार अडचणीत आले. त्यानंतर मारियो द्राघी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मारियो द्राघी 2021 पासून इटलीच्या पंतप्रधानपदी विराजमान होते.

Web Title: Italian Prime Minister Mario Draghi resigns as coalition collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.