Corona Virus : खळबळजनक! चीनहून इटलीला पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:39 PM2022-12-29T13:39:35+5:302022-12-29T13:51:31+5:30
Corona Virus : मालपेन्सा विमानतळावर एवढ्या मोठ्या संख्येने चिनी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इटालीचे अधिकारी घाबरले होते.
जगभरात चीनने थैमान घातले आहे. चीनहून इटलीच्या मिलान शहरात पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. दोन फ्लाइटमधून आलेल्या प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता इटलीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. मालपेन्सा विमानतळावर एवढ्या मोठ्या संख्येने चिनी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इटालीचे अधिकारी घाबरले होते.
कोरोना पॉझिटिव्ह लोकांची माहिती मिळाल्यानंतर लगेचच, इटलीच्या सरकारने कारवाई केली आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अनिवार्य कोरोना चाचणी नियम लागू केले. यासोबतच इटलीचे आरोग्य मंत्री ओरजीओ शिलाची यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधून इटलीला येणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रान्झिटमध्येही विशेष तरतूद करण्यात आली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
120 पैकी 62 प्रवाशांना संसर्ग
यापूर्वी जपान, भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी नियम लागू केले आहेत. स्थानिक माध्यमांनुसार, 26 डिसेंबर रोजी इटलीच्या मालपेन्सा विमानतळावर चीनहून आलेल्या पहिल्या फ्लाइटमधील 92 प्रवाशांपैकी 35 (38%) आणि दुसऱ्या फ्लाइटमधील 120 प्रवाशांपैकी 62 (52%) लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
जपान, दक्षिण कोरिया, ब्राझीलपर्यंत कोरोना कहर
एकीकडे चीनपासून जपान, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलपर्यंत कोरोना कहर पाहायला मिळाला. बुधवारी जपानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या 415 मृत्यूची नोंद झाली, जी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी देशात 219 नवीन कोविड रुग्ण आढळले, जे एका आठवड्यापूर्वीच्या तुलनेत 4 टक्के अधिक आहे. जपानमधील व्हायरसमुळे मृतांची संख्या 55,000 पार झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"