इटलीत आहे मृत्यूचे बेट...
By admin | Published: April 14, 2017 01:13 AM2017-04-14T01:13:22+5:302017-04-14T01:13:22+5:30
इटलीतील प्रोवेग्लिया बेट ‘आयलंड आॅफ डेथ’ (मृत्यूचे बेट) या नावाने कुख्यात असून त्याच्यावर कुणी चुकूनही गेला तरी त्याचे जिवंत परतणे अत्यंत कठीण आहे.
इटलीतील प्रोवेग्लिया बेट ‘आयलंड आॅफ डेथ’ (मृत्यूचे बेट) या नावाने कुख्यात असून त्याच्यावर कुणी चुकूनही गेला तरी त्याचे जिवंत परतणे अत्यंत कठीण आहे. या बेटावर १९२२ मध्ये मनोरुग्णांसाठी रुग्णालय बनवण्यात आले होते. परंतु या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स आणि नर्सेसला नेहमी काही असामान्य वस्तू दिसायच्या व त्यामुळे हे रुग्णालय बंद केले गेले. अनेक वर्षे हे रुग्णालय ओसाड पडले होते. १९६० मध्ये इटली सरकारने या बेटाला कोणाला तरी विकून टाकले. त्याचा मालक आपल्या कुटुंबीयांसह या बेटावर राहू लागला. एके दिवशी या बेटाच्या मालकाच्या मुलीच्या तोंडाचा कोणी तरी चावा घेतला. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व १४ टाके घालावे लागले. सातत्याने विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्यामुळे सरकारने या बेटावर जायला लोकांना बंदी घातली. १२० वर्षांपूर्वी या जागेचा वापर प्लेगग्रस्तांसाठी केला जात होता. प्लेगचा प्रसार आणखी जास्त होऊ नये यासाठी त्या रोग्यांना येथे सोडून दिले जायचे. त्यानंतर इतरही प्राणघातक आजारांच्या रोग्यांसाठी या बेटाचा वापर होत होता. या रोगांमुळे मरण पावलेल्यांना याच बेटावर पुरले जायचे. जेव्हा येथील रोग्यांची संख्या १.६० लाखांच्या वर गेली त्या वेळी त्यांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर या जागेला रोगाने बाधित समजले जाते व येथे यायला पूर्णपणे मनाई आहे.