मुलांना जिहादची शिकवण देण्यासाठी इसिसचं अॅप
By admin | Published: May 12, 2016 09:07 PM2016-05-12T21:07:16+5:302016-05-12T21:07:16+5:30
इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ माजवलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं लहानग्यांना जाळ्यात ओढण्यासाठी एक अॅप तयार केलं
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 12- इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ माजवलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं लहानग्यांना जाळ्यात ओढण्यासाठी एक अॅप तयार केलं आहे. या अॅपद्वारे लहान मुलांना जिहादची शिकवण दिली जाते आहे. 'जी' फॉर गन, 'टी' फॉर टँक आणि 'रॉकेट' या शब्दांचे अर्थ मुलांना अशा प्रकारे शिकवले जात आहेत.
इसिसनं 'लायब्ररी ऑफ झील' हे अॅप्लिकेशन सुरू केलं आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अँड्रॉइड फोनवर मुलांना अरेबिक मुळाक्षरांची ओळख करून दिली जाते आहे, अशी माहिती लाँग वॉर जर्नलमध्ये देण्यात आली आहे.
हे अॅप्लिकेशन इसिसच्या टेलिग्राम चॅनलसह अन्य फाइल शेअरिंग संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं आहे. मुलांना या अॅप्लिकेशनबद्दल आकर्षण वाटावं, यासाठी या अॅपवर काही खेळही दिले आहेत. ते खेळ अरेबिक अक्षरात लोड करण्यात आले आहेत. या अॅप्लिकेशनवर नशीद हे इस्लामिक गाणंही टाकण्यात आलं आहे. त्यातही जिहादी शब्द मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले आहेत.