अबब.. फक्त 14 मिनिटांमध्ये अण्वस्त्रवाहू विमान पोहोचणार अमेरिकेला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 05:58 PM2017-11-17T17:58:55+5:302017-11-17T18:40:44+5:30

तुम्हाला वाचून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे.

It's just 14 minutes to reach the US | अबब.. फक्त 14 मिनिटांमध्ये अण्वस्त्रवाहू विमान पोहोचणार अमेरिकेला

अबब.. फक्त 14 मिनिटांमध्ये अण्वस्त्रवाहू विमान पोहोचणार अमेरिकेला

Next

नवी दिली - तुम्हाला वाचून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. भविष्यात चीनमधून फक्त 14 मिनिटांमध्ये अमेरिकेेमध्ये अण्वस्त्रवाहू विमान पोहोचणार आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार चीन लवकरच हा अति वेगवान प्रवास शक्य करुन दाखवणार आहे. चीन अशा एका अण्वस्त्रवाहू विमानाची निर्मिती करत आहे. हे विमान अणवस्त्रे घेऊन अवघ्या 14 मिनिटांमध्ये अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहचू शकेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अण्वस्त्रवाहू विमानचा वेग 27 हजार मैल प्रती तास म्हणजेच 43 हजार200 किलोमीटर प्रती तास (12 किलोमीटर प्रती सेकंद) इतका असणार आहे. म्हणजेच या हायपरसॉनिक वेगाने उड्डाण करणाऱ्या विमानाचा वेग आवाजाच्या वेगाहून 35 पट अधिक असणार आहे. आजच्या तारखेला जगातील सर्वात वेगवान विंड टन न्यूयॉर्कमधील एलईएनएक्स-एक्स ही आहे. याचा वेग 22 हजार मैल प्रती तास म्हणजेच ३६ हजार किलोमीटर प्रती तास इतका आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार 2020 पर्यंत जगातील सर्वात वेगवान हायपरसुपरसॉनिक फॅसिलटी (चीनमधील विंड टनल) ची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर या विमानाची चाचणी घेण्यात येईल. दरम्यान, हायपरसुपरसॉनिक विमाने तयार करण्यासाठी विंड टनल्सचा उपयोग केला जातो. या टनल्समध्ये आवाजाच्या वेगाहून पाचपट अधिक वेगाने वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. जर चीनचा हा प्रयोग यशस्वी झाला तर चीन अगदी काही मिनिटांमध्ये जगातील कोणत्याही देशामध्ये हल्ला करु शकतो. तसेच युद्धप्रसंगी काही मिनिटांमध्ये चीन जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात शस्त्रांची ने-आण करू शकतो.

Web Title: It's just 14 minutes to reach the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन