'न्यू जर्सी'त पंढरीची वारी, रिंगणही पार पडलं; आषाढीनिमित्त पहिल्यांदाच अमेरिका दुमदुमली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 08:00 PM2023-06-27T20:00:41+5:302023-06-27T20:15:49+5:30

या डिजिटल वारीत वारकऱ्यांसाठी  हरीपाठ वाचनाचा शुभारंभ विठ्ठल मंदीरात,  झूम मिटींग वर दर मंगळवारी आषाढी एकादशीपर्यन्त आयोजित केला आहे.

It's Pandhari's turn in New Jersey, for the first time, America is reeling on the occasion of Ashadhi | 'न्यू जर्सी'त पंढरीची वारी, रिंगणही पार पडलं; आषाढीनिमित्त पहिल्यांदाच अमेरिका दुमदुमली

'न्यू जर्सी'त पंढरीची वारी, रिंगणही पार पडलं; आषाढीनिमित्त पहिल्यांदाच अमेरिका दुमदुमली

googlenewsNext

न्यू जर्सी - शारीरिक स्वास्थ्य  राखण्यासाठी मैलोन मैल चालणारे  न्यू जर्सीकर, तसेच भारतातून, आणि इतर राज्यांमधील विठ्ठलभक्त, अशा ३०० पेक्षा जास्त  वारकऱ्यांनी एकत्र येत  अमेरिकेतील या एकमेव वारीमध्ये सहभाग घेतला. वारकऱ्यांनी  गूगल फॉर्म्सने रेजिस्ट्रेशन करून  ४० पंढरपूर पथकांतील नामांतरीत दिंडयांमध्ये सहभाग घेतला. नियम एवढाच,  दररोज किमान १ ते ४ मैल चालत अथवा धावत, किंवा सायकलने, नियमाने वारी करणे. तसेच, रोज आपले माईलची नोंद, दिंडी प्रमुखाला कळवणे. आपल्या मायभूमीपासून सातासमुद्रापार असलेल्यांनी एकत्र येत तिथेच वाराची हा अद्भूत आणि उत्साही सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे या वारीत दिंड्या आणि रिंगणही पाहायला मिळालं. अमेरिकेत असलेल्या मराठमोळ्या वारकऱ्यांमुळे पहिल्यांदाच न्यू जर्सी आणि अमेरिका दुमदुमली. 

या डिजिटल वारीत वारकऱ्यांसाठी  हरीपाठ वाचनाचा शुभारंभ विठ्ठल मंदीरात,  झूम मिटींग वर दर मंगळवारी आषाढी एकादशीपर्यन्त आयोजित केला आहे. हा हा म्हणता हा वारीचा संकल्प कानोकानी पसरला आणि ३०० पेक्षा जास्त  वारकऱ्यांनी यात सहभाग घेतला. आजपर्यंत तब्बल ११,००० एकत्रित माईल, प्रवास विठ्ठल चरणी वाहिला. तब्बल १६१ माईल / २६० किमी म्हणजेच एक पंढरपूर  वारी चा हिशोब केला तर या विठ्ठल मंदिराच्या वारकऱ्यांनी ६८ पंढरीच्या वाऱ्या केल्या आहेत.

या वारीचा एक भाग - गोल रिंगण समारंभ  - 

प्पियांनी  पार्क, एडिसन येथे २४ जुन रोजी ४ एकर हिरव्यागार गवतावर ६०० पेक्षा अधिक  वारकऱ्यांनी, भाविकांनी  रिंगण करून ढोल ताशा, लेझीमच्या गजरात, खास आळंदीहुन आलेल्या ज्ञानेश्वर  माउलीच्या पादुकाचें, फुलांनी सजलेल्या पालखीत दर्शन घेतले. सर्व पुरुष वारकरी माथी चंदन तिलक, शुभ्र पांढरा पोषाख, टोपी, तुळशी माळा, दिंड्या पताका, भगवे ध्व्ज फडकावीत, तर समस्थ  महिला मंडळी, माथी चंदन तिलक, रंगी बेरंगी गोल अथवा नववारी साड्या, नथी, डोक्यावर तुळशीचे वृंदावन, मुखी हरी नामचा जप करीत गोल रिंगणाचा  भाविक फेरा धरला. ढोल ताशांच्या गजरात भाविक खूप रंगून गेल्याचं पाहायला मिळालं.

अन् वारी चुकली नाही

बरेच वयस्कर लोक जे कित्येक वर्ष वारी करत होते आणि सध्या अमेरिकेत त्यांच्या मुलांना भेटायला आले आहेत. त्यांना वाटत होते की यंदा त्याची वारी चुकणार, पण ह्या वारीने त्याचे मन आनंदाने गहिवरून आले. पांडुरंगाला अमेरिकेत भेटता आले म्हणून त्याचा आनंद गगनात मावेना... विठ्ठल मंदिरांच्या कार्यकर्त्यांना त्याच्या परिश्रमाची पावती मिळाली. वारकऱ्यांच्या शब्दात - पंढरपूर वारी न्यू जर्सीत  अनुभवली;  जणु पंढरपूर , न्यू जर्सीत मध्ये अवतरले.

उपस्थित वारकऱ्यांना वारीचा प्रसाद आणि पाणी वाटप केले. तसेच  विकत ठेवलेल्या  पापडी -चाट, वडा पाव, गुळाचा चहा, उसाचा  रस इत्यादी पदार्थांचा आस्वाद घेतला. २९ जून आषाढी एकादशी निमित्त  विठ्ठल-रखुमाईचे दर्शन -प्रसाद, यंदा फक्त आमंत्रित वारकऱ्यांसाठी आयोजित केला आहे. विठ्ठलाच्या कृपेने लवकरच मोठ्या विठ्ठल मंदिरात स्थलांतर आणि विस्तार करुन समस्थ भाविकांना एकत्र दर्शनासाठी खुले करू असा निर्धार ,  संस्थापक आनंद चौथाईनी (विश्वस्त) व्यक्त केला.
 

Web Title: It's Pandhari's turn in New Jersey, for the first time, America is reeling on the occasion of Ashadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.