गर्लफ्रेन्डची हत्या करून मृतदेह दफन करत होता, अचानक झालं असं की त्याचाही गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 16:42 IST2022-05-18T16:42:29+5:302022-05-18T16:42:38+5:30
US : एजफील्ड काउंडी शेरिफचे ऑफिसरने सांगितलं की, स्थानिक लोकांच्या सूचनेनुसार एक व्यक्त बेशुद्ध पडला आहे.

गर्लफ्रेन्डची हत्या करून मृतदेह दफन करत होता, अचानक झालं असं की त्याचाही गेला जीव
Boyfriend kills Girlfriend: अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आधी त्याच्या गर्लफ्रेन्डची हत्या केली. त्यानंतर जेव्हा तो तिला दफन करत होता तेव्हा त्यालाच हार्ट अटॅक आला आणि त्याचाच जीव गेला.
'न्यूयॉर्क पोस्ट'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामधील आहे. इथे राहणारा ६० वर्षीय जोसेफ मॅककिननने त्याच्या ६५ वर्षीय गर्लफ्रेन्ड पॅट्रिसिया डेंटची गळा आवळून हत्या केली होती. हे कृत्य त्याने गर्लफ्रेन्डच्या घरीच केलं होतं.
एजफील्ड काउंडी शेरिफचे ऑफिसरने सांगितलं की, स्थानिक लोकांच्या सूचनेनुसार एक व्यक्त बेशुद्ध पडला आहे. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांना खड्ड्यात आणखी एक मृतदेह आढळून आला. ती पॅट्रिसिया डेंट होती. दोघेही सोबत राहत होते.
चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा दोन्ही मृतदेहांचं पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा समजलं की, महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. तर पुरूषाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. त्याचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेन्डचा मृतदेह दफन करत होता. पोलिसांनी सांगितलं की, पुरूष त्याच्या गर्लफ्रेन्डला एका बॅगमध्ये टाकून दफन करत होता.