कोरोनाचे नियम मोडणं पडलं महागात, इवांका ट्रम्प यांच्यावर आली मुलांना शाळेतून काढण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 03:25 PM2020-11-15T15:25:00+5:302020-11-15T15:58:37+5:30
Ivanka Trump : अमेरिकेत शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. मात्र नियमांचं पालन केल्याचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांना देखील बसला आहे.
वॉशिंग्टन - कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेत शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. मात्र नियमांचं पालन केल्याचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांना देखील बसला आहे. इवांका ट्रम्प आणि त्यांचे पती जेरेड कुश्नर यांना आपल्या तिन्ही मुलांना दुसऱ्या शाळेत दाखल करावे लागले आहे.
वॉशिंग्टनमधील एका शाळेत इवांका ट्रम्प यांची तिन्ही मुलं गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण घेत होते. इवांका आणि त्यांचे पती जेरेड यांनी अनेकदा पालकांसाठी जारी करण्यात आलेल्या कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याची माहिती शाळाच्या व्यवस्थापनाने दिली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, इवांका ट्रम्प आणि त्यांच्या पतीने शाळेच्या पॅरेंट्स हँडबुकमध्ये नमूद केलेल्या कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन केलेलं नाही. मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टेंसिंगचा पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचं पालन केलं नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केली होती. इवांका आणि जेरेड हे पालकांसाठी असलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करत असल्याचं पालकांनी म्हटलं आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने इवांका आणि जेरेड यांना नियमांचे पालन करण्यास सांगितले. मात्र त्यांनी नियमांचं पालन न केल्याने शाळा व्यवस्थापनाला देखील चिंता होती.
CoronaVirus News : लसीकरण मोहिमेची तयारी सुरू, आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहितीhttps://t.co/BaCrD2hIxn#CoronaVirusUpdates#coronavaccine#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) November 11, 2020
अमेरिका राष्ट्राध्यक्ष वादविवादात संपूर्ण ट्रम्प कुटुंबीय उपस्थित होते. त्यावेळीदेखील इवांका यांनी मास्कचा वापर केला नव्हता. तसेच ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही इवांकाने स्वत:ला क्वारंटाईन केले नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.ट्रम्प यांनी "पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार" अशी घोषणा केली आहे.
निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प यांचं पहिलं भाषण; कोरोना लसीसंदर्भात केली मोठी घोषणा
ट्रम्प यांनी भाषणादरम्यान औषध कंपनी Pfizer च्या कोरोना लसीबद्दल नवीन माहिती दिली. निवडणुकीच्या निकालांतर ट्रम्प यांचं हे पहिलंच सार्वजनिक भाषण आहे. यामध्ये त्यांनी 2021 च्या एप्रिल महिन्यापर्यंत अमेरिकेच्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी अशा व्यक्त केली आहे. "काही आठवड्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि कोरोनाचा जास्त धोका असलेल्या नागरिकांना लस दिली जाईल. आमच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला Pfizer ची लस मोफत देण्यात येणार आहे" असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
Corona Vaccine : "या" महिन्यात दिली जाणार अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मोफत लस https://t.co/orT76naM7v#DonaldTrump#America#coronavaccine#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) November 14, 2020